Encroachers protest in Khamgaon : उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक
Khamgao शहरात नगरपालिका प्रशासनाने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आज शेकडो अतिक्रमणधारकांनी संतप्त मोर्चा काढत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजीसह उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला आणि त्यांना निवेदन देण्यात आले.
“आमचं अतिक्रमण नव्हे तर उपजीविकेचं साधन होतं”
मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “बऱ्याच वर्षांपासून लघु व्यवसाय करून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला बेरोजगार करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
Randhir Sawarkar : एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा विधानसभेत
१४१ वीज मीटर काढले
महावितरणनेही अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान मोठा टप्पा हाताळला आहे. सहाय्यक अभियंता नितीन डोंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमित जागांवरील १४१ वीज मीटर मागे घेण्यात आले आहेत.
“बुलडोझर थेट आमच्या पोटावर चालवला”
प्रशासनाने कारवाई करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता दडपशाही पद्धतीने मोहीम राबवली, असा आरोप करण्यात आला. “आम्हाला व्यवसायातील साहित्य हटवण्याचीही संधी दिली नाही. मुजोर अधिकाऱ्यांनी थेट बुलडोझर चालवून आमच्या कुटुंबीयांना रस्त्यावर आणले,” असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते.
Kanchan Gadkari : कांचन गडकरी म्हणाल्या, ‘आईकडून वारसा, नितीनजींचे मार्गदर्शन’!
मुख्याधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसान भरपाईची मागणी
या कारवाईमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून करण्यात यावी, अशी संतप्त मागणीही मोर्चाच्या माध्यमातून पुढे आली.
राजकीयही अंग घेतले आंदोलनाने
या आंदोलनात अतिक्रमणधारकांसह काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता स्थानिक राजकारणातही पडसाद उमटवण्याची शक्यता आहे.
Pratap Sarnaik : आषाढीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन
मोर्चेकऱ्यांची मागणी — चौकशी, पुनर्वसन, हॉकर्स झोन
प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अतिक्रमणधारकांना पर्यायी रोजगार आणि जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच हॉकर्स झोन तयार करून न्याय द्यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.








