Breaking

Chikhali Congress : तोंडी आदेशावर इमारत पाडणाऱ्यांना त्वरित निलंबित करा

suspend those who demolish buildings on verbal orders : विश्रामगृह पाडकाम वाद; चिखली काँग्रेसचा बांधकाम विभागावर घेराव

Buldhana बिना परवानगी आणि केवळ तोंडी आदेशाच्या आधारे विश्रामगृहाची इमारत पाडल्याच्या प्रकारावर आता राजकीय वाद उफाळून आला आहे. चिखली काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागावर सोमवारी घेराव आंदोलन करून जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

“नियम डावलून सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस”
राहुल बोंद्रे यांनी यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, “विश्रामगृहाची इमारत चांगल्या स्थितीत होती. शासनाने दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला असतानाही, ती इमारत कोणाच्या इशाऱ्यावर पाडण्यात आली? हे सरकार जनतेच्या पैशाचा असा अपव्यय का करत आहे? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.”

Sub-Divisional Officer : खामगावात अतिक्रमणधारकांचा एल्गार मोर्चा

“सार्वजनिक पाडकाम विभाग”
“नियमबाह्य पद्धतीने इमारत पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई न झाल्यास, काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या वेळी “सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव बदलून ‘सार्वजनिक पाडकाम विभाग’ ठेवावे,” असा जोरदार टोला कार्यकर्त्यांनी लगावला.

Randhir Sawarkar : एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा विधानसभेत

‘तोंडी आदेश’ असल्याची अधिकाऱ्यांची कबुली
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे — कंत्राटदाराला तोंडी आदेश दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, कनिष्ठ अभियंता आर.एस. कड यांनी इमारतीचा काही भाग ढासळत असल्याने संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने काम सुरू केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोण आहेत ‘बोलविते धनी’?
या सगळ्या घडामोडींमागे नेमके कोणाचे वरदहस्त आहे, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. “चांगल्या वास्तूचा विध्वंस, अनाठायी खर्च आणि नियमांचे उल्लंघन – याच्या मुळाशी जाऊन दोषींना निलंबित करा,” अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे.

Kanchan Gadkari : कांचन गडकरी म्हणाल्या, ‘आईकडून वारसा, नितीनजींचे मार्गदर्शन’!

कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, डॉ. मोहंमद इसरार, अतहर काझी, प्रा. नीलेश गावंडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, विकास लहाने, किशोर कदम आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.