Breaking

Bacchu kadu : जिल्हा बँकेत अध्यक्ष बच्चू कडू यांचा मनमानी कारभार

Financial irregularities by Bachchu Kadu and directors in the district bank : विरोधी संचालकांचा गंभीर आरोप; बँकेच्या कारभारात अनियमितता

Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू हे बँकेची सत्ता मिळाल्यापासून मनमानी निर्णय घेत आहेत. बँकेच्या कारभारात प्रचंड अनियमितता घडवत असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस भवन येथे झालेल्या परिषदेत जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, रवींद्र गायगोले यांच्यासह विरोधी संचालक उपस्थित होते.

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

रवींद्र गायगोले यांनी आरोप केला की, अध्यक्ष कडू आणि त्यांच्या सहायक संचालकांनी बँकेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी वारंवार खोटे प्रस्ताव मांडून त्यांना जबरदस्तीने मंजुरी मिळवली. यासंदर्भात सर्व पुरावे विभागीय उपनिबंधकांकडे सादर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Court News : ‘आय लव्ह यू’ म्हणणं गुन्हा होऊ शकत नाही !

न्यायालयीन शिक्षेची माहिती लपवल्याचा आरोप

२४ जुलै २०२३ रोजी बच्चू कडू बँकेचे अध्यक्ष झाले. मात्र, यापूर्वी नाशिक न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे ते अध्यक्षपदासाठी अपात्र असताना त्यांनी ती माहिती लपवली, असा आरोप बबलू देशमुख यांनी केला. अध्यक्ष झाल्यानंतर बँकेत अनावश्यक खर्च, बांधकाम आणि बेकायदेशीर प्रस्ताव मंजुरीच्या माध्यमातून बँकेला मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी समितीच्या आडून गैरव्यवहार

बँकेच्या संचालक मंडळात २१ सदस्य असून, मतदानाधिकार ठरावीक संचालकांनाच आहे. कोणताही प्रस्ताव मंजूर होण्यासाठी किमान ११ संचालकांचे मत आवश्यक असते. मात्र, अध्यक्ष कडू यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी समितीच्या आडून अवैध निर्णय घेण्यात आले. या समितीत त्यांच्या निष्ठावान लोकांना नेमून निर्णय घेतले गेले, असा आरोप करण्यात आला.

ravindra chavan : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

संगनमत करून बँकेचे नुकसान

अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे आणि संचालक आनंद काळे यांनी संगनमत करून बँकेच्या निधीचा गैरवापर केला. ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया पाळली न जाता, कोट्यवधींची लूट करण्यात आली, असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत विरोधकांनी केला.