Shiv Sena-BJP, once close friends, have become staunch opponents today : स्थानिक’च्या निवडणुकांआधी तापतेय राजकीय वातावरण
Mumbai: राजकारणाचा स्तर घसरत चाललाय, अशी टिका गेल्या १० – १२ वर्षांपासून सातत्यानं केली जात आहे. आता तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टिका करताना अगदी पातळी सोडल्याचं बघायला मिळतंय. ‘मोदी तुमचा बाप असेल, तो शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही’, असं वक्तव्य सभागृहात करून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काल (१ जुलै) खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नानांना एका दिवसासाठी निलंबितही केलं.
आज (२ जुलै) राजकीय कुरघोड्या करताना पुन्हा नेत्यांना एकमेकांचा बाप काढलेला आहे. हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबई तोडण्याच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे पक्षावर निशाणा साधला. आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झाला आहे, अशी भाषणे सुरू होतील, ही भाषणे पुन्हा कानावर पडायला लागतील. पण तुमच्यातही ताकद नाही अन् कोणाच्या बापातही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगंळ करण्याची ताकद नाही, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, तुमचाच दिल्लीतला बाप मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी ही हिंमत तुमचे दिल्लीतले बाप करत आहेत. चोराच्या मनात चांदणं, हा तोच प्रकार आहे. फडणवीसांवर मुंबई तोडण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा दबाव आहे. त्यामुळे त्यांना स्वप्नातही मुंबई तुटताना दिसत आहे. तसं नसतं तर अदानीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई ह्यांनी घातली नसती.
crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर टिका करताना पातळी ओलांडत चक्क एकमेकांचा बाप काढला. हा वाद आता वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावर आणखी काय उत्तर-प्रत्युत्तर येतात, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार, असं दिसतंय.