Breaking

District Bank controversy : जिल्हा बँक संचालक पदाचा वाद, बच्चू कडूंपाठोपाठ त्यांचे सहकारीही अडचणीत

Bachchu Kadu’s colleagues also got into trouble : आनंद काळे यांचा वर अपात्रतेचे संकट; विभागीय सहनिबंधकाकडून कारणे दाखवा नोटीस

Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) संचालक आनंद काळे यांचे संचालकपद सध्या अपात्रतेच्या उंबरठ्यावर आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना येत्या १४ जुलैपर्यंत यावर लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यापूर्वी अध्यक्ष बच्चू कडू यांचे संचालकत्व रद्द करण्यात आले होते. त्यांनी नंतर उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला होता. आता त्यांच्याच गटातील संचालक आनंद काळे यांना नोटीस बजावण्यात आल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या बँकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालेला असून, एकमेकांना अपात्र ठरविण्याची चढाओढ सुरू आहे.

Sudhir Mungantiwar : कृषी न्यायालय आणि एग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करा!

तक्रारीचा आधार काय?

२१ एप्रिल २०२५ रोजी बँकेच्या १२ संचालकांनी आनंद काळे यांच्याविरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ क (अ) नुसार तक्रार दाखल केली होती. बँकेच्या हिताविरुद्ध मनमानी निर्णय घेणे, नियमांना बगल देत आर्थिक अपहार करणे, आणि न्यायालयीन प्रकरणातील वकिलांची फी बँकेच्या खात्यातून नियमबाह्यपणे अदा करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यामुळेच त्यांच्यावर कलम ७८ अ च्या अनुषंगाने कारवाईचा विचार सुरू आहे.

आनंद काळे यांचा प्रतिवाद :
“माझ्याकडे विभागीय सहनिबंधकाची कोणतीही नोटीस आजच्या तारखेपर्यंत प्राप्त झालेली नाही. विरोधक केवळ सत्ता मिळविण्याच्या हेतूने बिनबुडाच्या तक्रारी करत आहेत. त्यांचे आरोप नैराश्यातून आहेत. मी कोणतेही गैरप्रकार केलेले नाही,” असे आनंद काळे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : तर एक वेळ नाही हजार वेळा माफी मागेन, पण…!

या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून, सहकार क्षेत्राचे लक्ष आता १४ जुलैला होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे.