Breaking

Harshvardhan Sapkal : पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!

Congresss effort to give responsibility to efficient, hardworking workers :कार्यक्षम, मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी, काँग्रेसचा प्रयत्न

Mumbai: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांत संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली. याचाच भाग म्हणून राज्यातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात काम करणा-या कार्यक्षम तसेच मेहनती कार्यकर्त्यांना महत्वांच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यां कडून स्वागत करण्यात येत आहे.पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण होत आहे.

पक्ष निरिक्षकांनी आधी राज्यातील सगळ्या जिल्ह्यांचे दौरे केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत निवड समितीच्या मुलाखतींनंतर नेमणुका करण्यात आल्या. या समितीत ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींचा समावेश आहे.

Devendra Fadnavis : नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा

ही निवड प्रक्रिया सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे. उर्वरित नियुक्त्यां लवकरच केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली आहे.