Breaking

Demolition of British-era rest house : ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडणे आले अंगलट!

Executive engineers asked for clarification : खुलासा मागवला; अधीक्षक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र

Buldhana चिखलीतील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृहाच्या रातोरात झालेल्या पाडकामानंतर उभा राहिलेला जनक्षोभ अखेर प्रशासनाच्या कानावर गेला. आता ही घटना चौकशीच्या केंद्रस्थानी आली आहे. अकोला विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश त्रिंबक धोंडगे यांनी बुलढाण्याचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांना पत्र देत सद्यस्थिती स्पष्ट करणारा सविस्तर खुलासा मागवला आहे.

२७ जून रोजी पाठविलेल्या पत्रात अधीक्षक अभियंत्यांनी यापूर्वी विभागीय कार्यालयाने पाठविलेल्या पत्रांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. विश्रामगृहाचे मजबुतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर असूनही अचानक घेतलेल्या पाडकामाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी स्पष्टीकरण मागवले आहे.

Mumbai High Court : न्यायालयाचा दणका आणि दोन तासांत जीआर!

विश्रामगृहाच्या पाडकामानंतर नागरिकांत तीव्र संताप उसळला. सोशल मीडियावरून व विविध माध्यमांतून प्रशासनाच्या भूमिकेवर टीका झाली. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या गरजेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली. अनेकांनी या पायाभूत वारशाच्या जतनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत प्रशासनाच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अधीक्षक अभियंत्यांनी लेखी पत्र पाठवून खुलासा मागवलेला असला तरी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते, असे नागरिकांचे मत आहे. आता सदर खुलाशानंतर पुढील प्रशासकीय कारवाई काय होते, दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाते का, की हा प्रकार गाळून टाकला जातो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुनगंटीवार म्हणाले, सोलर पंपांची सक्ती अन्यायकारक; शेतकऱ्यांना एजी पंप द्या!

एतिहासीक विश्रामगृह पाडल्यानंतर चिखलीत राजकारण तापले हाेते. राजकीय पक्षांनी आंदाेलने करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली हाेती. या आंदाेलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे.