Breaking

Vidarbha Farmers : बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Farmers in Buldhana district in trouble due to fake seeds : मलकापूर तालुका उद्धव सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Malkapur बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट बियाण्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात मलकापूर तालुका उद्धव सेनेच्यावतीने तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर तालुक्यात दिव्यरत्न कंपनी, अग्रो जेनेटिक्स, सुफलाम सिड्स, या कंपन्यांनी विक्रीस काढलेली सोयाबीन बियाण्यांचे विविध वाण (फुले किमया ७५३, फुले दुर्वा ९९२, ग्रीन लिम्का जिएलए-५५११, सम्राट) बनावट असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारींमधून समोर आले आहे. त्यामुळे असंख्य कास्तकारांना पुन्हा एकदा पेरणी करावी लागणार आहे.

successful surgery : कर्करोगामुळे ‘प्रायव्हेट पार्ट’ गमावलेल्या तरुणाच्या जीवनात नवी पहाट

या पार्श्वभूमीवर बनावट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे तहसील विभाग, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत तातडीने करण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Demolition of British-era rest house : ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडणे आले अंगलट!

‘शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही खंबीरपणे उभे आहोत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. अ‍ॅड. साहेबराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज आहोत. मलकापूर उबाठा शिवसेना सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे,’ असे तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी स्पष्ट केले.