Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सभागृहात खेळखंडोबा; सदस्य आहेत तर मंत्री नाही, मंत्री उपस्थित पण सदस्य गायब..!

Controversy over absentees in session period : असंच चालत असेल तर स्पेशल सिटींग घेऊ नये

Mumbai : महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात सभागृहात कामकाज चालवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे आणि या नियमावलीनुसार कामकाज व्हावे, ही मंत्री आणि सर्व सदस्यांची अपेक्षा असते. पण काही मंत्री आणि सदस्य सभागृहाच्या नियमांना फाटा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे कामकाजात नियमित सहभागी होणाऱ्या मंत्री आणि सदस्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. असाच प्रकार आज (४ जुलै) विधानसभा सभागृहात घडला. त्यामुळे कामकाजाचा खेळखंडोबा होतोय, अशी सदस्यांची भावना झाली.

लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना काही लक्षवेधी सदस्य नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या, तर काही मंत्री नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या. यावेळी मंत्री संजय शिरसाट sanjay shirsat म्हणाले, आम्हाला कार्यक्रम पत्रिका रात्री ११.३० वाजता मिळाली. त्यानंतर त्यावर अभ्यास केला. पहाटे उठून ब्रिफींग तयार केले. त्यानंतर सभागृहात येणे, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, यासाठी नियोजन करावे लागते, ते आम्ही करतो. पण येवढे केल्यावर सदस्यच सभागृहात उपस्थित नसतील. तर काय उपयोग आहे?

Rane vs Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा; हा तर जुहूचा निब्बर!

सदस्य नसल्यामुळे एकापाठोपाठ एक लक्षवेधी पुढे ढकलल्या जात आहेत. याला काय अर्थ आहे? लक्षवेधीसाठी आपण स्पेशल सिटींग घेत असतो. सभागृहात हे असंच सुरू राहिलं तर यापुढे स्पेशल सिटींग घेऊ नये, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहाला सांगितले. दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण दटके pravin datake यांनी यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, मंत्री उत्तरे द्यायला उपस्थित आहेत, पण सदस्य नाही, येवढेच खरे नाही. तर काही लक्षवेधींचे सदस्य उपस्थित आहे. लक्षवेधी क्रमांक दोन आणि तीनचे सदस्य उपस्थित आहेत. पण मंत्री महोदय उपस्थित नाहीत, हेही खरे आहे. त्यामुळे कुणाची चुकीची भावना होऊ नये. येवढं सगळं झाल्यावर तालिका अध्यक्षांना पुढील लक्षवेधी म्हणजे क्रमांक सहा वर चर्चा सुरू केली.