Farmers have become mute animals, Nana Patola criticizes the government ; शेतकरीच मूक जनावर बनला, नाना पटोल्यांची सरकारवर टीका
Mumbai : महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती वाईट आहे शेतकरी आत्महत्या करत आहे. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतकरी शेतीत एक लाख खर्च करतो पण सरकार जीएसटी च्या माध्यमातून 18 हजार कापून घेते. आणि त्यातील तुटपुंजी मदत करत माज दाखवला जातो. त्याचे सगळेच प्रश्न अवघड करून ठेवले आहेत. माझ्या शेजारच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात 24 तास वीज असते इतरांना मात्र ती आठ तास ही मिळत नाही. सरकार फक्त मोठ्या आकडे आणि खोटे आश्वासन देतो बिचारा शेतकरी एक मुख्य जानवर बनला आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या व्यथा भयानक आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने आकडे जाहीर केले आहेत. त्यावर भाजपच्या लोकांनी प्रत्युत्तर दिलं की, तुम्ही कर्नाटक मध्ये बघा बाकीच्या राज्यात बघा त्याच्यापेक्षा महाराष्ट्र चांगला आहे. अशा पद्धतीची भूमिका आपण पाहिली. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केलं. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील तर हे भूषणावह होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, कारण त्याला आपण सगळे दोशी आहोत.
Mangal Prabhat Lodha : मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
सरकार म्हणते ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना खूप मोठी मदत देतोय. आकडे पण मोठे मोठे सांगण्यात येतात. पण एक वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. तो शेती कसा करणार. लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यांनी स्वतःला बैलाच्या जागी जुंपून घेतले, ही बाब जगभरात पोचली महाराष्ट्रासाठीही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हा प्रकार घडल्यावर सरकार आणि इतर लोक त्याला मदत करत आहेत. शेतकऱ्यांनी मदतीसाठी असेच प्रकार कायम करत राहणे सरकारला अपेक्षित आहे का, असा प्रश्न आहे फोटोले मी उपस्थित केला.
राज्याचे कृषिमंत्री गायब झाले. अधिवेशनात दिसत नाहीत, गोरक्षणाचा कायदा केला पण तथाकथित गोरक्षक आणि पोलीस यांचे संगणक आहे. शेतकऱ्यांचे बैल जप्त केले जातात. त्याचा शेतकऱ्यांना तोटा होत आहे. मालाला हमीभाव नाही. पाण्याची बॉटल 50 रुपयात मिळते पण शेतकऱ्याच्या दुधाला फक्त 30 रुपये भाव आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. मोठमोठ्या उद्योगपतींचे करोडोचे कर्ज माफ केले जातात. शेतकऱ्यांच्या नावाने पिक विमा योजना आणल्या पण त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच झाला सगळी आकडेवारी समोर आहे.
Mahayuti Government : केशरी रेशनकार्डधारक वंचितच; गरजूंना स्वस्त धान्य नाकारले
राज्यात सध्या विजेचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. त्यांना सौर पंपासाठी प्रवृत्त केले जात आहे. मात्र त्यांचे अर्ज धुळखात पडले आहेत. एकीकडे वीज नाही दुसरीकडे सौर पंप नाही. अशी स्थिती आहे रात्रीची वीज अनेक ग्रामीण भागात सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळते. इतर भागात मात्र फक्त आठच तास मिळते. हा कोणता न्याय आहे? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यां बद्दलची अशी मानसिकता सरकारची असेल, तर न्याय कसा मिळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आणि या संदर्भातील सर्व प्रश्नावर सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी ही केली.