Breaking

Pankaj Bhoyar : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी

SIT to be form within month for Shalartha ID Scam : महिनाभरात अंमलबजावणी; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा

Nagpur राज्यातील सर्वांत हॉट टॉपिक ठरलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी महिनाभरात एसआयटी SIT स्थापन करण्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात मागणी होत होती. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

विधानपरिषदेत आ. संदीप जोशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ. भोयर यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत वीसहून अधिक जणांना या घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार संदीप जोशी यांनी नागपूर विभागात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले.

Jai Gujarat controversy : चूक नाही – मुख्यमंत्री, केम छो साहेब- आव्हाड, हा मंत्रिमंडळात कसा? – राऊत

या प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र अद्याप एसआयटी समिती नेमण्यात आली नाही. ही समिती कधीपर्यंत घोषित करण्यात येईल, विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती चांदा ते बांदा अशी आहे. त्यामुळे घोषित करण्यात येणाऱ्या एसआयटीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर असावी.

घोषित करण्यात येणारी एसआयटी, २०१२ नंतर संपूर्ण राज्यात झालेल्या नियुक्त्या, बदल्या, शाळा हस्तांतरण तसेच शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रकरणातील राज्यव्यापी घोटाळ्याची चर्चा करणार काय, यापूर्वी शिक्षण आयुक्तांनी नियुक्ती मान्यता प्रकरणात दोषी घोषित केलेल्या 5 शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई तत्काळ करणार काय, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : संत्र्याची झाडे लागलेली आहेत, तर मग अंशतः कसे ?

नागपूर विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आता मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस, विधी अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेल्या चौकशी समितीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती भोयर यांनी दिली.