Breaking

Pune rape case : तो ना नराधम, ना कुरिअर बॉय, तो निघाला तिचा ‘बॉय फ्रेंड’

Girl filed a rape complaint to vent her anger on her boyfriend : नाजूक प्रसंगी झाला वाद, तिने रचली बलात्काराची हादरवणारी कहाणी

Pune कोंढवा भागातील उच्चभ्रू वसाहतीत, एका कुरियर बॉयने पार्सल देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची, हादरवून टाकणारी घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. मात्र बलात्काराचा आरोपी ना नराधम होता, ना कुरियर बॉय होता. तो तक्रारकर्त्या तरुणीचा बॉयफ्रेंड होता, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

शारीरिक संबंध प्रस्थापित करताना तिने त्याला अडकवण्यासाठी बलात्काराची कहाणी रचली. त्याने ते कृत्य झाल्यावर सेल्फी काढली. ‘मी पुन्हा येईन’ असा मेसेज टाकला, असा आरोप तिने केल्यामुळे तीव्रता वाढली आणि खळबळ माजली. महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नराधमाला पकडून कडक शिक्षा करण्याची मागणी झाली. प्रकरण चांगले तापत होते.

Mahayuti Government : बहिणीच्या खात्यात पैसे, भावाची झोळी रिकामी!

घटनास्थळी कुठलेही पुरावे न सापडल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यांनी सुमारे 10 पथक स्थापन करत आरोपीचा कसून शोध सुरू केला. ती तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला आहे. दोन वर्षांपासून कोंढवा परिसरात भावासोबत राहते. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता तो युवक तिचा बॉयफ्रेंड असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ट्विस्ट आले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या संपर्कात असून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यादिवशी मुलीची इच्छा नसताना त्याने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्यांचा वाद झाला. त्यामुळे तिने त्याला धडा शिकवण्यासाठी बलात्काराची कहाणी रचली. डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग झाल्याची स्टोरी रंगवली. मात्र,तरुणाला पकडल्यावर हा ‘लव्ह, सेक्स अन् धोका’, असा प्रकार समोर आला. तक्रारदार तरुणी आणि तो तरुण गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघांची कुटुंबही एकमेकांच्या परिचयाची आहेत.

तो तरुण तिच्या घरी अनेकदा यायचा. सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक संपूर्ण माहिती नोंद करून घेतात. त्यामुळे खरे नाव सांगितल्यास अडचण येऊ शकते, याचा विचार दोघांनी केला. त्यांनी शक्कल लढवली. प्रत्येकवेळी तो तरुण कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा. सुरक्षा रक्षकांनी खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची.

बुधवारी संध्याकाळी दोघांचे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे तो दरवेळसारखा फ्लॅटमध्ये शिरला. त्याने शरीरसुखाची मागणी केली. मात्र, तरुणी त्यासाठी तयार नव्हती. तरुणाला कंट्रोल झाले नाही. त्याने बळजबरी केली. त्यानंतर सेल्फी काढून तो निघूनही गेला. मात्र, या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणीने ‘कुरिअर बॉय’ने अत्याचार केल्याची तक्रार केली. ती करण्याआधी तिने मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला.

Nagpur Municipal Corporation : व्वाह रे सरकार! भर पावसाळ्यात पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’!

आपण आरोपी आहोत, हे त्याल माहितीच नव्हते

महत्त्वाच्या कुरिअर कंपन्यांच्या दिल्ली कार्यालयांशी संपर्क करुन त्यांच्याकडे काम करणाऱ्या कुरिअर बॉयची माहिती पोलीस मागवत होते. पण, या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत, याचा त्या तरुणाला पत्ताही नव्हता. नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या ऑफीसमधे काम केले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अन् प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली.