Hair falls due to bad water : बाधीत गावांतील पाणी वापरण्यास अयोग्य
Buldhana जिल्ह्यातील शेगांव Shegaon तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून केस गळतीच्या समस्या नागरिकांमध्ये आढळून आल्या. यासंदर्भात आरोग्य विभागाने तपासणी केली असता या गावातील बोअरवेल व विहिरींचे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
केस गळतीची समस्या असलेल्या गावांतील पाणी उपयोगात आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना केले आहे. शेगांव तालुक्यातील कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुजीरा व निंदी या गावांमध्ये केस गळत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाचे पथक पाठवून सर्वेक्षण करुन बांधीताची तपासणी व चाचण्या करुन कार्यवाही करण्यात येत आहे.
Gondia Zilla Parishad : अध्यक्षाचे नाव नागपुरातून बंद लिफाफ्यात येणार !
तसेच काही नागरिकांचे स्कीन बायपसी टेस्टींग (Skin Biopsy Testing) व पाण्यामधील हेवीमेटल्स आरसेनिक व लीड याची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्वचारोग तज्ज्ञ यांनी रुग्णांची पाहणी केली. प्राथमिक निदान फंगल इन्फेक्शन असु शकते व त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्षणे पाहुन उपचार सुरु केले आहेत. जवळपासच्या तक्रार आलेल्या गावात आरोग्य पथक घरोघरी गेले. सर्वे करीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष पथक तसेच राज्यस्तरावरुनसुद्धा वैद्यकीय पथक बाधीत गावात भेट देणार आहे. बाधीत गावात झालेले केस गळती ही कोणत्याही व्हायरसमुळे झाले नसल्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये किंवा अफवावर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
धरणातून पाण्याचा पुरवठा
बाधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वारी हनुमान येथील धरणातून होत असून येथील पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तथापी, बहुतांशी गावामध्ये वापरण्याच्या पाण्याचा स्त्रोत बोअरवेल किंवा विहिर आहे. आणि हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या पाण्यामध्ये नायट्रेट व टिडिएस प्रमाणाबाहेर असल्याचे दिसून येते.
नागपूरच्या प्रयोगशाळेत नमुने
त्वचारोग तज्ञांनी सुचविल्यानुसार पाण्यामध्ये आरसेनिक व लीड या हेविमेटल्सची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधीत गावांतील पाण्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्वचेचे व पाण्याचे नमुने अहवाल प्राप्त होण्यास पुढील आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे बाधीत गावांतील नागरिकांनी अयोग्य असलेले पाणी पिण्यास किंवा इतर उपयोगात आणू नये, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.