Breaking

Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले

‘Mr. Shinde, you are insulting the Marathi people’ : ‘ मिस्टर शिंदे तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात’

Mumbai : एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, आहे. अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामे केली. पैसे काय काय कमावले? संपत्ती काय काय कमवली? उपकार करताय का? पारसी समाजाने सुद्धा येथे योगदान दिले आहे. सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारण्यात पारसी समाजाचे आहे. मिस्टर शिंदे तुम्ही असे बोलून मराठी माणसाचा अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या श्रमातून आणि रक्तातून निर्माण झाली आहे.

मुंबईही या शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही. एकनाथ शिंदेंनी सर्वात आधी माफी मागितली पाहिजे. शिंदे यांची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबाबत फडणवीस यांनी देखील माफी मागितली पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या समोरच जय गुजरातचा नारा दिला. यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. यानंतर शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे त्या अनुषंगाने जय गुजरात म्हटले. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Swami Anand Swaroop : ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा;

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं कच्चं मडकं आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीने गोंधळलेले आहेत. त्यातून त्यांच्याकडून अशा प्रकारचे विधाने होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये आहे? गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता. एकनाथ शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे मराठा संस्थान आहे. बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचं राज्य होतं, म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांची मराठी राज्य आहेत.

transporters strike : मालवाहतूकदारांचा संप तूर्त स्थगित पण टांगती तलवार कायम!

मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की, पेशवे देखील तिकडेच गेले होते. इतिहास मला देखील माहित आहे. योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका. महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरं म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.