Pratap Sarnaik will hold a meeting at the Ministry, BJP leader MLA Sudhir Mungantiwar had followed up : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत होणार चर्चा
Mumbai : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्याच्या विकासासाठी असंख्य कामे केलेली आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल शहरात बस आगार मंजूर आहे. नगरपरिषदेकडून जागाही आरक्षित करण्यात आली आहे. पण पुढील कार्यवाही शासन स्तरावर अडली आहे. यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी (७ जुलै) मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
आमदार मुनगंटीवार यांच्या सातत्यापूर्ण प्रयत्नाचे हे यश आहे. बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे MSRTC व्यवस्थापकीय संचालक, मुंबईचे संबंधित अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून रखडलेल्या आगाराच्या कामाला गती मिळणार आहे. या निमित्ताने मुलवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.
Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले
मुल शहरात बस आगार स्थापन करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दुपारी २.३० वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत बस आगारासाठी जागा निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब, निर्णयाची अंमलबजावणी, संबंधित विभागांमधील समन्वय आणि संभाव्य अडचणी यांवर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. बैठकीला आमदार मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.