Sanjay Gaikwads criticism of Thackeray brothers brand : ठाकरे बंधूंच्या ‘ ब्रँड’ वर संजय गायकवाड यांची टीका
Mumbai : ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच 288 जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळीही 70-74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. वेळ निघून गेलीय, अशी टीका ही संजय गायकवाड यांनी केली आहे.
मुंबईत ठाकरे बंधूंचा मेळावा झाला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने 19 वर्षांनंतर ते व्यासपीठावर एकत्र दिसले. यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात कोणताच ब्रँड चालत नाही, महाराष्ट्रात फक्त विकास हाच ब्रँड चालतो. शेतकऱ्यांचं हित बघेल, गोरगरिबांना मदत करेल, तरुणांना रोजगाराची संधी देईल, त्यांचाच ब्रँड चालेल, असं संजय गायकवाड यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना शुभेच्छा आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनाही जमलं नाही. मात्र आज ते दोघं एकत्र आले. त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा.
Ashadhi Ekadashi 2025 : अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ||
आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का, असा सवाल उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमा सहन करता कामा नये, असंही ते म्हणाले.
Eknath Shinde : राज यांच्या भाषणात तळमळ पण उद्धवच्या भाषणात मळमळ दिसली !
हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निरहुआनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘आपण मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा’ असं थेट चॅलेंज त्यांनी दिलंय. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं निरहुआ म्हणाले.