Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
Mumbai : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला! असे म्हणले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या विजयी मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
सरनाईक यांनी शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे. आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, असं सरनाईक यांनी पत्राद्वारे म्हणाले आहे.
Hindi Marathi Conspiracy : भांडण केले सत्तेसाठी अन् एकत्र येत आहेत, तेही सत्तेसाठीच !
पत्राच्या माध्यमातून सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या भावनेला वाट करून देण्यासाठी तीन पानाचं पत्र लिहिलं आहे. यामध्ये ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला, असं म्हटलं आहे. कशापद्धतीनं मराठी माणसाला टोपी घालण्यात आली, आणि हे सगळं ठाकरे बंधू कशापद्धतीनं पाहात होते? या सर्वांचा उल्लेख आहे.
Homeopathy Vs Allopathy : होमिओपॅथी डॉक्टरांना ‘ कोर्स’ अॅलोपॅथी डॉक्टरांचा मोठा विरोध
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यचा डाव आहे, असा अपप्रचार काहीजण वर्षांनुवर्ष करत आहोत, आणि मराठी माणसांची मत लाटली जात आहेत. मुंबईचा नाही पण प्रत्यक्षात स्वत:चाच विकास शिवसेना ठाकरे गटानं केला आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकणार नाही, ती हिंमत कोणातच नाही, हेही यांना चांगलंच माहीत आहे, परंतु तरी देखील हे सांगितलं जात आहे, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.