Breaking

District Bank Election : वडेट्टीवार-धानोरकर कालपर्यंत भांडले, आता बँकेतील सत्तेसाठी एकत्र!

Vadettiwar, Dhanorkar forget the dispute for power in the bank : बुडत्याला काठीचा आधार; काँग्रेसमधील अंतर्गत वादांवर बँकेच्या निवडणुकीचा पडदा

Chandrapur राजकारणात काहीही होऊ शकते, हे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाने सिद्ध केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बँकेची निवडणूक तर त्यापुढे फारच छोटी बाब आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून तर कालपर्यंत एकमेकांची सावलीही न बघणारे, एकमेकांवर जाहीर टीका करणारे काँग्रेसचे नेते आता बँकेतील सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आले आहेत. विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे एकत्रीकरण किती दिवस टिकणार, हे लवकरच कळणार आहे.

जिल्ह्यात सध्या जिल्हा बँक निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहेत. कायम एकमेकांचा पाय ओढण्यात अग्रेसर असणारे एकाच पक्षातील जुने विरोधक पुन्हा सक्रीय झाले आहेत. रविवारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित येण्याचा प्रयोग काँग्रेसने केला. नेहमी एकमेकांचे पाय खेचणारे नेते एकत्र आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून त्यांच्यात महाभारत झाले. विधानसभा निवडणुकीतही हा वाद कायम होता. त्यांचे एकत्र दिसणे तर लांबच पण एकमेकांवर जाहीर टीका टिप्पणी करण्याची संधीही त्यांनी कधीच सोडली नाही.

Gopichand Padalkar : उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद… भाजप आमदाराची जीभ घसरली

पण, आता बँकेच्या संचालक मंडळाच्या खुर्चीच्या निमित्ताने अंतर्गत वादाचे खाते तात्पुरते गोठवण्यात आले आहे. खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या नागपूरच्या घरी सदिच्छा भेट दिली. नंतर वडेट्टीवारांनी सुद्धा चंद्रपुरात धानोरकरांच्या बंगल्यावर येऊन एकत्रीकरणाची टाळी दिली. केवळ विठोबाला नव्हे तर, चर्च दर्ग्यालाही त्यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र भेट दिली.

सुरुवातीला धानोरकर यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे आणि भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्याशी हात मिळवणी केली. तब्बल 12 उमेदवार बीनविरोध निवडून आले. सध्या काँग्रेसचे सहा तर भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार भांगडिया बँकेचे मार्गदर्शक होण्याच्या तयारीत दिसले. पण प्रयोगाला खरा रंग नंतर आला. खरी रंगत आली जेव्हा वडेट्टीवार यांची मार्गदर्शक पदाची खुर्ची डळमळीत झाली. मग त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांच्या हिताचे रक्षण, माझी जबाबदारी !

भांगडिया यांची घोडदौड रोखण्यासाठी बुडत्याला काठीचा आधार म्हणून वादाच्या तलवारी म्यान केल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शिक्षक आमदार अडबाले, बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार यांच्यासह इतर नेत्यांची खासदार धानोरकर यांच्या आकाशवाणी जवळच्या बंगल्यात बैठक घेत रणनीती ठरली.

आपण ३५६ पदांची जम्बो नोकर भरती केल्याचा अभिमान व्यक्त करून स्वतःसाठीच टाळ्या पिटण्यात आल्या. अर्थात अनेक शेतकऱ्यांनी संचालकांच्या नावावर सातबारे केले, हे वास्तव सर्वांना ठावूक आहे. पण पुन्हा नौकरभरती करून लाभ करून घेऊ अशी आस लावून त्यांनी बँकेच्या राजकारणात उडी घेण्याचा निर्णय घेतला.

Raj – Uddhav Thackeray : यापेक्षा जास्त गर्दी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला होती !

काँग्रेसच्या बैठकीत बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घेण्याचे आणि विजय बावणे यांना बिनविरोध निवडून आणण्याचे ठरले. चंद्रपूर तालुका अ गटातून बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, ओबीसी गटातून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनाही निवडून आणण्याची रणनीती आखण्यात आली. ब वर्ग गट दोन मधून रोहित बोम्मावार ,उमाकांत धांडे, किशोर ढुमणे यांच्यापैकी काहींनी ढुमणे यांना, तर काहींनी बोमावार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अनुसूचित जाती गटातून उभे असलेले ललित मोटघरे यांना पाठिंबा देण्याचे ठरले. वरोरा अ गट – जयंत टेमुर्डे, विजय देवतळे, वसंत विधाते, यांच्यात लढत होईल. भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गात पांडुरंग जाधव, दामोदर रुयारकर, यशवंत दिघोरे यांच्यात सामना रंगणार आहे.