Villagers bid farewell to martyred soldier with tears : राजस्थानात अपघाती निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Buldhana उदयपूर (राजस्थान) येथे सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेले अमोना गावचे सुपुत्र जवान मोहनसिंग रामराव इंगळे (वय ५२) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (६ जुलै) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी अश्रूंनी नयनांनी अंतिम निरोप दिला.
मोहनसिंग इंगळे हे गेल्या २५ वर्षांपासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) सेवेत होते. मुख्यालयाकडे जात असताना त्यांचा अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगलट आला !
६ जुलै रोजी त्यांचे पार्थिव मूळगाव अमोना येथे आणण्यात आले. गावात प्रवेश करताच ‘भारत माता की जय’, ‘शहीद जवान मोहनसिंग इंगळे अमर रहें’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कारावेळी संभाजीनगर येथील सीआयएसएफ कमांडो पथक, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे व त्यांचे सहकारी तसेच बुलढाणा पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जवानाला मानवंदना देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.
Eknath Shinde : शिंदे गटाच्या नेत्याच्या नावाने बेरोजगारांची फसवणूक
मुखाग्नी त्यांच्या आई-वडील, पत्नी व दोन मुलांनी एकत्र दिला. यावेळी पत्नीने ‘भारत माता की जय’चा जयघोष केला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. नायब तहसीलदार, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.