Breaking

Chandrashekhar Bawankule : देशात अराजकता पसरवण्याची मानसिकता योग्य नाही !

It is not right to beat up migrants living in Maharashtra : आपले जे लोक इतर प्रातांत राहतात, त्यांच्यासोबतही हे होऊ शकतं

Nagpur : मराठी – मराठी करत काही लोग या मुद्यावर विनाकारण आक्रमक होत आहेत. वर्षानुवर्षांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर प्रातांतील लोकांना मारझोड केली जात आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे प्रकार योग्य नाही. ज्यांचा जन्म येथे झाला आणि ते येथे राहतात, अशा लोकांना टार्गेट करणे योग्य नाही. जसे काही ते पाकिस्तानचे आहे, असा व्यवहार त्यांच्यासोबत केला जात आहे, हे बिलकुल चालणार नाही. यावर कारवाई करायला पाहिजे. मी याबाबत बोलणार आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजासाठी आज (७ जुलै) मुंबईला जाण्यापूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी परप्रांतियांना विनाकारण त्रास देणाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले मराठी लोकांचे संरक्षण आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करतोच आहे. पण राज्याबाहेरच्या लोकांना अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही. यामुळे इतर प्रातांत जे आमचे लोक राहतात, त्यांच्यासोबतही उद्या असंच होऊ शकतं. अशी देशात अराजकता पसरवण्याची मानसिकता बाळगणं योग्य नाही.

Raj – Uddhav Thackeray : हे पुढे एकत्र राहतील, याची शंकाच वाटते !

राज्य सरकारच्या रेती धोरणाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. नव्या धोरणामुळे मोठा फायदा होणार आहे. सुर्योदयापासू ते सुर्यास्तापर्यंत जी रेती स्टॉक होते, ती रेती घाटावरून उचलून वाहतुकीचा परवाना २४ तासांचा आहे. रात्री रस्ते मोकळे असतात. इतर वाहतूक कमी असते. त्यामुळे सर्व ट्रान्सपोर्ट कंपन्या आणि जनतेची मागणी होती की २४ तासांची परवानगी द्यावी. त्यामुळे उत्खणन दिवसा आणि ट्रान्सपोर्ट २४ तास, असा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.