Breaking

Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Hundreds of youth from Chikhalgaon circle join Shiv Sena : विविध राजकीय पक्षांतील माजी सरपंच, पंचायत समिती सदस्यांचा समावेश

Akola उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दिलजमाईनंतर ठाकरे गटातील प्रवेशाला वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चिखलगाव व माझोड परिसरातील शेकडो युवकांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये विविध राजकीय पक्षांतील माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत त्याचा किती फायदा होणार, हे वेळच सांगणार आहे.

या सामूहिक पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाप्रमुख गोपालराव दातकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, शहरप्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, तालुकाप्रमुख नितीन ताथोड, डॉ. गजानन मानकर, शेतकरी सेनेचे संघटक सुरेंद्र विसपुते आदींची उपस्थिती होती.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : आम्ही तक्रार केली, पण त्यांच्यात एफआयआर खिशात ठेऊन फिरण्याची क्षमता !

या प्रवेशामध्ये माझोडचे माजी सरपंच गजानन निलखन, चिखलगावचे उपसरपंच शिवलाल पाटील ताले, माजी पंस सदस्य सचिन थोरात यांच्यासह सुनील वावकर, अनंतराव वाकोडे, प्रवीण व अनिरुद्ध चतरकर, विकी येवले, शरद चतरकार, रामाभाऊ बिल्लेवार, विनोद जाधव, संतोष डोंगरदिवे, नीतू पाटील, उमेश वराळे, गजानन खर्डे, बाळू पाटील टाले आदी युवकांचा समावेश आहे.

Orange City Park : आमदार ठाकरेंनी उघडकीस आणला घोटाळा, ‘ऑरेंज सिटी’ चे काम थांबले !

या प्रवेशामुळे चिखलगाव सर्कलसह संपूर्ण भागात शिवसेनेला नवचैतन्य प्राप्त झाले असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.