EX-MLA attacks on chief minister Devendra Fadnavis : बच्चू कडू यांची फडणवीसांवर टीका, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
Amravati “मुख्यमंत्री विदर्भाचा आहे, पण शेतकऱ्यांच्या कामाचा नाही,” अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. विदर्भातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर वीज न मिळाल्यामुळे पिके करपत आहेत. अशा स्थितीत सरकारचे अपयश स्पष्ट असून, आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन कडू यांनी केले.
“१४ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आंबोरा येथे होणाऱ्या सभेला शेतकऱ्यांनी रूमने आणि लाठ्याकाठ्यांसह उपस्थित राहा,” असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं.
Harshwardhan sapkal : गुंडगिरी करणाऱ्या गायकवाडला पक्ष कसा पाठीशी घालतो?
‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या निर्धाराने सुरु झालेली ‘७/१२ कोरा करा’ यात्रा तिसऱ्या दिवशी दारवा तालुक्यातील तळेगाव येथे पोहोचली. या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कडू यांनी म्हटलं, “आपला लढा जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. सरकार ही तुमच्या श्रमाच्या मोबदल्यात पैसा खात आहे आणि जाती-धर्माच्या नावाखाली भांडणं लावून देत आहे.”
शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना कडू म्हणाले, “धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या नादी लागू नका. ही लढाई शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठीची आहे. ही भूमी वसंतराव नाईकांची आहे, जिथून हरित क्रांतीची सुरुवात झाली. आता याच भूमीतून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत.”
कडू यांनी वीज वितरणावरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना रात्री अपरात्री वीजपुरवठा केला जाते. वेळेवर वीज मिळत नाही. पिके करपत आहेत. तरीही राज्याचा मुख्यमंत्री गप्प का?”