AAP to contest Nagpur municipal corporation election : नागपूर महापालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार
Nagpur महाविकास आघाडी आणि महायुतीच्या एकूण सहा पक्षांचे गणीतच अद्याप बसलेले नाही. हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास अनेक छोट्या पक्षांचे हाल होणार आहेत. अश्यात आम आदमी पार्टीने नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. आता युती-आघाडीच्या गर्दीमध्ये ‘आप’ कशी बाजी मारणार, याची उत्सुकता लागलेली असेल.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी जाहीरनामा देखील जारी केला आहे. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन येथे आपच्या कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. जरवाल म्हणाले, ‘निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा जाहीर करीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वात दिल्ली-पंजाबमध्ये यशस्वी ठरलेले जनहिताचे मॉडेल आता नागपूरमध्ये उतरविले जाईल.’
Raj Thackeray : …तर काढला जाऊ शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा !
भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत नागपूरकरांना न्याय, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि विकासाचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी आम आदमी पार्टी, नागपूरतर्फे महानगरपालिका निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रत्येक घरात नळाद्वारे दररोज २० हजार लिटर मोफत पाणी देण्याचे तसेच मनपाच्या ११४ शाळांना उच्च दर्जाचे शिक्षक व ५० आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मनपा शाळांचे रूपांतर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, असं ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : जंगलाजवळच्या शेती पडीत राहणार नाहीत, बावनकुळेंनी सांगितला मार्ग !
मनपाच्या ११४ शाळांना उच्च दर्जाचे शिक्षक व ५० आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मनपा शाळांचे रूपांतर करणार. तसेच प्रत्येक घरात नळाद्वारे दररोज २० हजार लिटर मोफत पाणी असे आश्वासन आपतर्फे देण्यात आले आहे.तसेच सर्वच प्रभागांमध्ये मोफत टेस्ट व उपचाराची मोहल्ला क्लिनिकच्या रूपाने आरोग्य केंद्रे उभारणार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांचे स्मारक शिक्षण संकुल उभारणार असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.