Breaking

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘प्राचार्य म्हणजे नेतृत्वाची परीक्षा’

The post of principal is a test of leadership : सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी, प्राचार्य परिषदेत संवाद

Nagpur प्राचार्यपद म्हणजे नेतृत्वाची परीक्षा आहे. उत्तम शिक्षण देणारे शिक्षक आपल्या संस्थेत असावेत आणि टीमवर्क आणि सामूहिक प्रयत्नांतून उत्तम विद्यार्थी घडावेत, ही जबाबदारी प्राचार्यांवर असते. सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी प्राचार्यांवर आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर सहोदया स्कुल कॉम्प्लेक्स या संस्थेच्या वतीने बेसा येथील पलोटी स्कूलमध्ये प्रादेशिक प्राचार्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला फादर जोसेफ, संस्थेच्या अध्यक्ष भारती बिजवे, सचिव वंदना बिसेन, दि साऊथ पब्लिक स्कुलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Vidarbha Farmers : शेतकरी चढला टॉवरवर; दागिने विकून पैसे भरले, पण सौर पंप लागला नाही!

भारताची भविष्यातील सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आहे. डॉक्टर किंवा इंजिनियर्स तयार होणे आवश्यक आहेच. पण त्यासाठी आग्रही असण्यापेक्षा ज्ञान प्राप्त करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे, असं गडकरी म्हणाले. काळानुसार होणारे बदल स्वीकारून व्यावहारिक कुशलता व प्रसंगावधान बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला

चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षण हे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे आज शिक्षणावर होत असलेली गुंतवणूक भविष्यातील भारत घडविण्यासाठी आहे. आज तुम्ही काय शिकवणार त्यावर सारे काही अवलंबून आहे, असं गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : नागपूरकरांचे हाल होण्याची वाट बघत होते का?

कुठल्याही क्षेत्रात परफेक्शन आणि स्कील अत्यंत महत्त्वाचे आहे. पण ते एका दिवसातील काम नाही. ती एक प्रक्रिया आहे. चांगले कौशल्य आणि गुणवत्तेवर कुणाचे पेटंट नाही, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जीवनमूल्य बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे उद्याचा सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर द्यावा लागेल. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, सहकार्य, समन्वय आणि गुणवत्ता या सूत्रांचा अवलंब देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले.