Breaking

Mahayuti Government : भाजप-राष्ट्रवादी भिडले, अमरावतीत महायुतीमध्ये तणाव

NCP lodge police complaint against BJP MLA : भाजप आमदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, वरुड पोलिस ठाण्यावर धडक

Amravati भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात वरुड पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतीच पोलिस ठाण्यावर जोरदार धडक दिली. यामुळे मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून राजकीय वातावरण तापले आहे.

माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी विद्यमान आमदार चंदू यावलकर यांच्यावर वरुड, मोर्शी आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषद क्षेत्रातील विकासनिधी मुद्दाम थांबविल्याचा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी भुयार यांच्यावर धमक्यांचे आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, यामुळे संघर्षाची तीव्रता वाढली आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : पीक विमा कंपन्यांनी 10 हजार कोटी कमावले!

पोलिस ठाण्याच्या पायरीपर्यंत गेलेल्या या प्रकरणामुळे आता तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. माजी आमदार भुयार यांनी १५ कोटी रुपयांची विकासकामे शासनाकडून मंजूर करून घेतली होती. मात्र, ती निधी रद्द केल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी विश्रामगृह वरुड येथे आयोजित पत्रकार परिषदेत भुयार यांनी आमदार यावलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतरच राजकीय संघर्षाला सुरुवात झाली.

या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, दोन्ही पक्षांतील वाद मिटवण्यासाठी ठाणेदारांनी मध्यस्थी करावी, अशी स्थानिक जनतेची अपेक्षा आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : पीक विमा कंपन्यांनी 10 हजार कोटी कमावले!

Illegal Sand Mining : अधिकारी झोपेत आहे, खडकपूर्णा धरणातून बिनधास्त उपसा रेती!

दरम्यान, आमदार यावलकर यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर उपस्थिती दर्शवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तारेश देशमुख, वरुड तालुकाध्यक्ष विजय वडस्कर, युवक अध्यक्ष निलेश गोमकाळे, तसेच सागर आलोडे, विजय तुमडाम, वैभव टेकाडे, बिट्टू देशमुख, महेंद्र तुपकर, निलेश साबळे, योगेश निकम, मुकेश लिखार, दिगंबर निकम, ओंकार बहुरुपी, दिनेश जावरकर, निखिल बनसोड, संदीप माळोदे, पुंडलिक बासुदे, सुमित घोरमाडे, श्याम आजनकर, जगबिरसिंग भावे, साबीर खान, कुशल अंबाडकर, मंगेश गोडबोले, अमोल चोबितकर, प्रमोद मोरे, रेखा रामटेके, सविता मारबदे, दिवाकर मानकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.