Two Panchayat Samiti groups including Zilla Parishad group cancelled : जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीचे दोन गण रद्द; वाढलेली लोकसंख्या कुठे मोजली?
Shegao शेगाव शहरालगत असलेल्या रोकडिया नगर ग्रामपंचायतीचा समावेश नगर परिषदेच्या हद्दीत करण्यात आला असून, याचा थेट फटका तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांना बसला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
२०११ च्या जनगणनेनंतर शेगाव तालुक्यात ग्रामीण लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. परंतु रोकडिया नगरच्या लोकसंख्येत घट झाली म्हणून संपूर्ण गट व गण रद्द करणे अन्यायकारक असल्याचे मत राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे. “जिथे लोकसंख्या वाढली, तिथं गट वाढायला हवा, पण उलट गटच कमी केला गेला!” – असा संतप्त सवाल आता लोकप्रतिनिधी आणि नागरिक विचारत आहेत.
Grampanchayat Swdat : लोकांनीच मतदान करून सरपंचाला केले पायउतार!
तहसीलदार दीपक बाजड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडिया नगरची लोकसंख्या ८,७१५ इतकी झाली असून, त्यामुळे जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण रद्द करावे लागले. मात्र एकूण लोकसंख्या ८७,२२९ असून, त्यानुसार तीन जिल्हा परिषद गट राहायला हवेत, असे स्पष्ट मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.
या बदलामुळे कुठल्या तरी राजकीय पक्षाला फायदा मिळावा म्हणूनच गट व गण रद्द करण्यात आले का? अशी चर्चा देखील तालुक्यात सुरू झाली आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी व निवेदने देण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.
रोकडिया नगरच्या समावेशामुळे नवीन तयार झालेले जिल्हा परिषद गट खालीलप्रमाणे आहेत:
माटरगाव बुद्रुक – जानोरी गट
समाविष्ट गावे: भास्तन, कालवड, कठोरा, डोलारखेड, वरध, माटरगाव बु./खु., ब्राह्मणवाडा, सगोडा, भोनगाव, चिचखेड, मच्छिंद्रखेड, तरोडा, खातखेड, बोडगाव, डोंगरखेड उजाड इ.
Illegal Sand Mining : ७० बोटी नष्ट, २१ कोटींचे नुकसान; तरीही माफियांवर लगाम नाही!
जलंब – जवळा बुद्रुक गट
समाविष्ट गावे: बेलुरा, मोरगाव डिग्रस, पहूरजीरा, जलंब, कुरखेड, निंबी, सांगवा, एकफळ, आळसना, गौलखेड, खेर्डा, टाकळी विरो/हाट, लासुरा खु./बु., इरखेड, चिंचोली, सवर्णा, गायगाव, शिरजगाव निळे, वरखेड खु./बु., तित्रव, महागाव, गव्हाण, तरोडा कसबा