Participation of Harshvardhan Sapkal, Jitendra Awhad, Ambadas Danve : हर्षवर्धन सपकाळ, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवेंचा सहभाग
Mumbai : पावसाळी अधिवेशनात बुधवारी जन सुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं. आता त्यावरून राजकारण सुरु झालं आहे. जनसुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करु नये, अशी मागणी महाविकास आघाडी ने केली आहे. त्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी मविआचे नेत्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा प्रमुख समावेश होता.
जन सुरक्षा विधेयक मंजूर झालं. पण त्यावर विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी करु नये. हे लोकहिताच नाही हे सांगण्यासाठी मविआचे नेते राजभवनात गेले. दुसरी मागणी आहे ती काल विधिमंडळात झालेल्या हाणामारीची. राज्यात गुंडाशाही सुरु आहे, याची दखल राज्यपालांनी घ्यावी. राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
Awhad Padalkar controversy : विधानसभा परिसरातील सामान्यांच्या प्रवेशाला बंदी येणार !
जन सुरक्षा विधेयक दहशतवादी विचारांना खतपाणी घालणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आणलं आहे. पोलिसांना डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि बंडखोरांविरुद्ध कारवाई करताना अडचण येते, म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे. मात्र या विधेयकाला काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत हवा तसा विरोध केला नाही. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस हायकमांडने या प्रकरणी थेट पक्षाच्या आमदारांना नोटीस बजावून जाब विचारला आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना साकडे घातले असून या विधेयकावर सही करू नये अशी मागणी केली आहे. यासोबत राज्यात सध्या सुरू असलेल्या वादावरून महाविकास आघाडीने सरकारला लक्ष केले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी महत्त्वाची मागणी केली आहे
______