14 objections registered on the Zilla Parishad and Panchayat Samiti group structure : २० जुलैला मुदत संपली; १८ ऑगस्टला अंतिम गट-गणरचना जाहीर होणार
Amravati जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या गट-गण प्रारूप रचनेवर जिल्ह्यातून एकूण १४ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ गटांवर आणि पंचायत समितीच्या १ गणावर हरकती दाखल झाल्या आहेत. २० जुलैला हरकती नोंदविण्याची मुदत संपुष्टात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने गट-गणांचे प्रारूप प्रसिद्ध केले. या प्रारूपात अनेक गटांची नावे बदलण्यात आली आहेत. तर काही गट वाढवले आणि काही कमी करण्यात आले आहेत.
नवीन गटांमध्ये धारणी तालुक्यात बैरागढ तलई, कळमखार, टिंटबा, सावलीखेडा, चिखलदऱ्यात चुरर्णी, काटकुंभ व जामली, चांदूर बाजारमध्ये ब्राम्हणवाडा थडी, मोर्शीमध्ये पिंपळखुडा मोठा, दर्यापूरमध्ये थिलोरी, नांदगाव खंडेश्वरमध्ये फुबगाव आणि धामणगावमध्ये चिंचोली हे गट निश्चित झाले आहेत.
लोकसंख्या वाढ लक्षात घेता अचलपूर तालुक्यात धोतरखेडा गटात दोन नवीन गण वाढवले गेले, तर चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड गट व त्याखालील दोन गण कमी करण्यात आले आहेत. हरकतींचा आढावा घेतल्यास, चिखलदरा १, मोर्शी २, भातकुली २, दर्यापूर १, चांदूर रेल्वे ३, तिवसा २, धारणी १ अशा गटांवर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
Manikrao kokate controversy : शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असलेल्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या
पुढील टप्पे:
२८ जुलै : सर्व हरकती तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारीमार्फत विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात पाठविण्यात येणार
११ ऑगस्टपर्यंत : सुनावणी व हरकती निकाली काढणे
१८ ऑगस्टपर्यंत : अंतिम गट-गणरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर