Recognition of significant contribution to nation building; राष्ट्रनिर्मितीतल्या भरीव योगदानाची दखल
Pune : देशातील पायाभूत सुविधा विकासात नेतृत्वाची भूमिका बजावणारे आणि रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025’ जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी, लोकमान्य टिळक यांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त, पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या विशेष सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.डॉ. रोहित टिळक यांनी पुरस्कार जाहीर करताना गडकरी यांच्या दूरदृष्टीचा, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विस्ताराचा आणि पायाभूत सुविधांमधील क्रांतीचा विशेष उल्लेख केला.
‘ रस्ते हे विकासाचे माध्यम आहेत’ या तत्त्वाला अनुसरून गडकरींनी देशभरात रस्त्यांचे विशाल जाळे उभे केले. सार्वजनिक – खासगी भागीदारी च्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे त्यांनी पायाभूत विकासाच्या संकल्पनांना गती दिली. विशेषतः ‘नमामी गंगे’ सारख्या पर्यावरणपूरक योजनांना सामाजिक चळवळ बनवण्याचे श्रेयही त्यांनाच जाते, असेही डॉ. टिळक यांनी नमूद केले. लोकमान्य टिळक यांच्या विचारांप्रमाणे, स्वदेशीच्या तत्वाला वाहून घेत गडकरींनी वाहन निर्मितीत स्थानिक उत्पादनाला चालना दिली. रस्त्यांच्या माध्यमातून आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी भारताच्या विकासात मोठी भर पडली आहे.
Hani trap case : कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता !
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या विक्रमी वेळेत झालेली निर्मिती हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड मानला जातो. या प्रकल्पात मॉडेलचे यशस्वी प्रयोग करत शासन – खासगी क्षेत्रातील समन्वयाचे आदर्श उदाहरण घडवले. नितीन गडकरी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी होणारा गौरव हा केवळ व्यक्तिक नव्हे, तर देशाच्या आधुनिकतेकडे वाटचाल करताना पारंपरिक मूल्यांना न विसरता काम करण्याची दिशा दर्शवणारा आहे.
___