Breaking

Maharashtra politics : स्टॅम्प पेपरवर लढाईचा करारनामा, नवा राजकीय तमाशा !

Sanjay Gaikwad, Imtiaz Jalil face to face! :
संजय गायकवाड, इम्तियाज जलील आमनेसामने!

Mumbai ; राज्याच्या राजकारणात पुन्हा एक अनोखा आणि वादग्रस्त प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी लढाई करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तिगत टीका आणि वादाच्या मर्यादा ओलांडत आता हे प्रकरण थेट रिंगणात लढाई करण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कँटीनमध्ये शिळे वरण मिळाल्याने चालकाला टॉवेलवर येऊन मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि कँटीन चालकावरही कारवाई झाली.याच घटनेवर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले होते, मी जर त्या चालकाच्या जागी असतो तर गायकवाड यांना अद्दल घडवली असती. यावर प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाले, कँटीन मालक जर जलील असते, तरी मी त्यांनाही चोपले असते.

Maharashtra Congress : नव्या कार्यकारिणीत 40 टक्के ओबीसी नेत्यांचा समावेश !

गायकवाड यांनी आता थेट स्टॅम्प पेपरवर लिहून जाहीर केलं आहे की त्यांची आणि जलील यांची लढाई होणार आहे. या करारनाम्यात त्यांनी खालील अटी स्पष्ट केल्या आहेत: लढाईत दगड, धोंडे किंवा कोणतेही शस्त्र वापरले जाणार नाहीत. तिसरा कोणी सहभागी होणार नाही पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी लढाईमधून काहीही झाले, तर जबाबदारी केवळ दोघांचीच राहील
लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ जलील ठरवतील, असेही आव्हान गायकवाड यांनी दिले आहे

Kokate Rummy Game : कृषीखाते अजित दादांनीच संभाळावे

या वादात आता ‘ जग तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा…’ असे वाक्य ऐकू येऊ लागले आहे. दोघेही जण राजकीय भूमिकांपेक्षा वैयक्तिक वादाच्या दिशेने वळले आहेत. जलील यांनी दिलेलं आव्हान गायकवाड यांनी स्वीकारल्याचं या करारनाम्यामुळे स्पष्ट झालं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण म्हणजे लोकशाही आणि राजकारणाचा मोठा अपमान आहे. एकीकडे राज्यात प्रश्नांचं आणि जनतेच्या अडचणींचं मोर्चे आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी वैयक्तिक वादातून हातघाईच्या तयारीत आहेत.

____