New twist in contractor Harshal Patil suicide case : कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ‘ ट्विस्ट’
Mumbai : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील कंत्राटदार आणि अभियंता हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, शासनाकडून वेळेत कामाचे पैसे न मिळाल्यामुळे, आणि त्यामुळेच वाढलेल्या कर्जबाजारीपणाच्या मानसिक तणावामुळे त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, हर्षल पाटील यांची कोट्यवधींची बिले शासनाकडे प्रलंबित होती. वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले आणि त्यांनी आत्महत्या केली. ही घटना सरकारच्या असंवेदनशील कारभाराचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याची टीका यानिमित्ताने होत आहे.
Bachhu kadu: प्रहार संघटनेचे राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
या प्रकरणावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांन भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘ हर्षल पाटील हे अभियंता होते. त्यांचं नाव जलजीवन मिशन अंतर्गत कुठल्याही अधिकृत कामात नोंदलेलं नाही. त्यांचं बिल आमच्या योजनेखाली प्रलंबित नसल्याचे कार्यकारी अभियंत्यांनीही स्पष्ट केलं आहे. कदाचित त्यांनी सबलेट स्वरूपात दुसऱ्याच्या नावाने काही काम घेतलं असेल. परंतु त्याची शासकीय नोंद कुठेच नाही.’
त्याचबरोबर, जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आणि संबंधित अधिकार्यांशी मी स्वतः संपर्क केला. यामध्ये कुठल्याही सरकारी प्रक्रियेचं उल्लंघन झालं नाही. संजय राऊत यांनी याबाबत अधिक तपास करूनच वक्तव्य करावं, केवळ राजकीय फायद्यासाठी अपूर्ण माहितीवरून आरोप करणं योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Sanjay Raut : त्यांनी महाराष्ट्राचं स्मशान केलं हा तर सदोष मनुष्यवध !
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर तीव्र प्रतिक्रिया दिली. मोदींनी दोन दिवस महाराष्ट्रात थांबावं, आणि फडणवीस सरकारने कसं राज्याचं स्मशान केलं आहे, ते स्वतः पाहावं. ही आत्महत्या नसून सदोष मनुष्यवध आहे. सरकारच्या निष्काळजी पणामुळे एक तरुण उद्योजक जीवन संपवतो, आणि कोणी जबाबदारी घेत नाही, हे दुर्दैव आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली.
हर्षल पाटील यांची आत्महत्या केवळ एक वैयक्तिक निर्णय होता की सरकारच्या व्यवस्थेतील ढिसाळपणाचा परिणाम, हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल. पण ही घटना राज्यातील असंख्य ठेकेदार, काम करणारे अभियंते, आणि योजनेच्या अंमलबजावणीत गुंतलेल्या लोकांच्या व्यथांना आवाज देणारी ठरत आहे.
_____