Suspense remains over change in ward format : प्रस्तावावर अंतिम मुदतीपर्यंत १४ हरकती
Amravati जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण १४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ही रचना तशीच कायम राहणार की काही प्रभागांमध्ये फेरबदल होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.
जिल्हा परिषद आणि तिच्या अधीन असलेल्या १४ पंचायत समित्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२२ मध्ये संपल्यानंतरपासून प्रशासनाच्या ताब्यात या संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून १४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी गट व गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती.
या प्रस्तावावर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. अंतिम मुदतीपर्यंत १४ हरकती प्राप्त झाल्या असून, त्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. परिणामी, जिल्हा पातळीपासून ते पक्षश्रेष्ठींपर्यंत सर्वांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे.
राजकीय चाचपणी आणि दौऱ्यांना वेग
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.
यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
– जिल्हा परिषद गट : ५९
– पंचायत समिती गण : ११८
१८ ऑगस्टला अंतिम फैसला?
प्राप्त हरकती तहसील कार्यालयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्या असून, त्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर गट व गणांची अंतिम रचना तयार करून ती १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे.
Tribal Pardhi Society : आदिवासी पारधी समाजाला हवे उच्चपदस्थांचे पाठबळ !
आरक्षण सोडतीकडे लक्ष
प्रभाग रचनेइतकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे गट व गणांची आरक्षण सोडत. कोणता गट किंवा गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो, यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय गट-गणसंख्या
तालुका गट – गण
धारणी ५ – १०
चिखलदरा ४ – ८
अंजनगाव सुर्जी ३ – ६
अचलपूर ६ – १२
चांदूर बाजार ६ – १२
मोर्शी ५ – १०
वरूड ५ – १०
तिवसा ३ – ६
अमरावती ५ – १०
भातकुली ३ – ६
दर्यापूर ४ – ८
नांदगाव खंडेश्वर ४ – ८
चांदूर रेल्वे २ – ४
धामनगाव रेल्वे ४ – ८