Akola Airport : अकोला विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल

Minister Muralidhar Mohol held an urgent meeting : खासदारांच्या मागणीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची तातडीची बैठक

Akola विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक तातडीने आयोजित करण्यात आली. यावेळी अकोल्यातून छोट्या विमानसेवेचा प्रस्ताव, प्रस्तावित ड्रोन अकॅडमी आणि विमानतळाच्या विस्तारासंदर्भातील विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, IGRUAचे संजू दास आणि अंकित कुमार यांच्यासह विविध केंद्रीय अधिकारी उपस्थित होते. अकोला येथून नवी मुंबई, पुणे आणि गोवा या शहरांशी थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया आणि कंपन्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश राज्यमंत्री मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

APMC : अचलपूर बाजार समितीतील कोटींचा घोटाळा उघडकीस

खासदार अनुप धोत्रे यांनी या बैठकीत सांगितले की, अकोला विमानतळ हे स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे. हवाई पट्टीच्या सीमा वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, लवकरच त्यासंदर्भात ठोस निर्णय अपेक्षित आहे. त्यांनी अकोल्यातून छोट्या विमान सेवेचा प्रस्ताव मांडताना अकोलेकरांना हवाई सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली.

या बैठकीत अकोल्यात प्रस्तावित असलेल्या ड्रोन अकॅडमी स्थापनेबाबतही चर्चा झाली. अकोला हे विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून, येथील शिक्षणासाठी आठ जिल्ह्यांतून विद्यार्थी येतात. त्यामुळे ड्रोन अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी मिळेल, असे धोत्रे यांनी सांगितले.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार?

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खासदार अनुप धोत्रे यांचा विकासाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कौतुकास्पद असल्याचे सांगून, “या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा करून अकोल्याला न्याय देण्याचे प्रयत्न करू,” असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना अडचणी समजून घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.