Manikrao Kokate and Sanjay Shirsat’s ministerial posts are in danger : माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदांवर टांगती तलवार
Nagpur : राज्य सरकारमधील दोन मंत्री माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदांवर टांगती तलवार आहे. विधान परिषदेत रमी खेळल्याच्या प्रकारानंतर कोकाटे जरा जास्तच अडचणीत आले आहेत. सोमवारी त्यांचा राजीनामा होणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. साडेसाती दूर करण्यासाठी त्यांनी शनीदेवाचे दर्शन घेतले. यापूर्वी पैशांच्या बॅगसह असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाटांनीही शनीदेवाचे दर्शन घेतले होते. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता, पुजा कुणी करायची, कुणाची करायची, यासंदर्भात चर्चा करण्याची गरजच नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधील वादांबाबत विचारले असता, फार वाद नाहीत. आम्ही काही अधिकार राज्यमंत्र्यांना देत आहोत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे याबद्दल विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कॅबिनेट मंत्र्यांना विचारणा केली आहे. आम्ही सर्व कॅबिनेट मंत्री आपआपल्या राज्यमंत्र्यांना काय अधिकार देणार, हे सांगणार आहोत. महसूल विभागात मी तीन हजारांपेक्षा जास्त सुनावणी राजमंत्र्यांकडे सोपवली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने ओबीसींच्या तीन हजार जातींचा अपमान केला !
संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन आरोप केले पाहिजे. असे आकडे सांगून काय होणार? सरकारबद्दल बोलताना विचार करून बोलले पाहिजे. असे टोमणे मारणे योग्य नाही. जर ७५ टक्के मंत्र्यांबद्दल त्यांना आक्षेप असेल तर त्यांनी नावे घेतली पाहिजे, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. बोगस जन्मदाखल्यांच्या संदर्भात आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व बोगस जन्मदाखले परत घेण्याचे आदेश दिलेले आहेत. या मुदतीच्या आत आम्ही बोगस दाखले परत घेऊ, असे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Manikrao Kokate : ‘शासन भिकारी आहे’ कृषीमंत्री कोकाटे यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
अजित पवार यांनी काही अधिकाऱ्यांना फटकारले. यावर अजित दादा अधिकाऱ्यांना जे काही बोलले असतील, ते सार्वजनिक हितासाठीच बोलले असतील. ते त्यांचे वैयक्तिक बांधकाम नव्हते. अधिकाऱ्यांनी काम केले नाही तर फटकारावेच लागेल. त्यांना कामात काही त्रुटी आढळल्या असतील. त्यामुळे कदाचित ते बोलले असतील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.