MLA Mahale says Stunned by the Development Projects Initiated by Sudhir Mungantiwar : जिल्ह्यात सुधीरभाऊंनी निसर्ग आणि शिक्षणाशी जोडलेले अनेक प्रकल्प उभारले
Chandrapur : हजार हातांनी आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचं संवर्धन कसं करावं याचा प्रत्यक्ष अनुभव चंद्रपूरमध्ये आल्यावर आला, अशा शब्दांत चिखली विधानसभेचे आमदार श्वेता महल्ले यांनी माजी वनमंत्री आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केला.
आ.मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेल्यावर आमदार महल्ले यांना एक विशेष भेट दिली ,कापडी नव्हे, तर बांबूपासून बनवलेला राष्ट्रध्वज. वन प्रबोधिनीच्या बांबू संशोधन केंद्राची ही देण, पर्यावरणस्नेही उपक्रमांची साक्ष देणारी ठरली.
चंद्रपूरच्या भेटीत आमदार महल्ले भारावून गेल्या. रस्ते आणि नालीपलीकडे जाऊन सुधीरभाऊंनी निसर्ग आणि शिक्षणाशी जोडलेले अनेक शाश्वत प्रकल्प उभारलेत, हे पाहून त्या थक्क झाल्या. १०८ हेक्टरमध्ये उभारलेलं श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान हे फक्त झाडांचं संग्रहालय नाही, तर एक जिवंत प्रयोगशाळा आहे. औषधी वनस्पतींचं शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधी यातून निर्माण होत आहेत.बागेतील मत्स्यालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि राखीव राखलेलं जंगलाचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे, अशी भावना त्यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्ट मध्ये व्यक्त केली.
Sudhir Mungantiwar : सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊबद्दल नितांत आदर !
महिला सक्षमीकरणासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या धर्तीवर बल्लारपूरमध्ये ज्ञान संकुल उभारले गेले आहे. “ज्ञानाच्या बळावर जग बदलणाऱ्या महिला इथं घडतील,” असं आमदार महल्ले यांनी नमूद केलं.१२३ एकरमध्ये विकसित झालेली अत्याधुनिक सैनिकी शाळा ही सुधीरभाऊंच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. राष्ट्रभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा येथे विकास केला जातो. आ.मुनगंटीवार यांचं कार्यालय हे सौंदर्यदृष्टी आणि निसर्गप्रेम यांचं उत्तम उदाहरण आहे. कार्यालयाचा बघितल्यावर त्याची प्रेरणा मिळते, असं महल्ले म्हणाल्या.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, …म्हणून शिवाजी महाराज सर्व राजांपेक्षा वेगळे !
अतिशय अभ्यासू नेतृत्व माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद कायम स्मरणात राहतील. या भेटीत अनेक आश्चर्यांचा मला परिचय झाला. चंद्रपूरच्या निसर्गसंपदेला अनुसरून जे शाश्वत प्रकल्प येथे उभारलेत ते पाहून आपण थक्क झालो. पुढच्या अनेक पिढ्यांना लाभ देणारे हे प्रकल्प आहेत. बॉटनिकल गार्डन ही साधी झाडाझुडपांची बाग नाही. येथे विविध औषधी वनस्पती, त्यांची नावे आणि माहिती दिलेली आहे. यातून संशोधन तर होतेच, पण वनस्पतींची ही श्रीमंती खरोखर आपल्या भूमीचे वैभव आहे. अशी भावना आ.श्वेता महल्ले यांनी यावेळी व्यक्त केली.