Female officer throws ‘on duty’ party on rooftop : वीज बील कमी करून देण्याच्या नावावर गरीब लोकांकडून वसुली
Yavatmal : नागपूर शहरात मनीष नगर येथे एका बारमध्ये बसून दारूचे घोट घेत शासकीय कामकाज करीत फायलींवर सह्या करण्यात आल्या. हे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या घटनेनंतर लगेच यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथे आणखी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिला अधिकारी ‘ऑन ड्युटी’ आपल्या पुरूष सहकाऱ्यांसोबत एका धाब्यावर ओली पार्टी करताना आढळल्या. या घटनेचाही व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे.
वीज महावितरणच्या LDC या पदावर कार्यरत असलेल्या रोशना राऊत या आपल्या सहकाऱ्यांसोबत गाव खेड्यांमध्ये जाऊन गरीब लोकांकडून वीज बिल कमी करून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात आणि याच पैशांतून ‘ऑन ड्युटी’ पार्ट्या करतात, असे आरोप त्यांंच्यावर नेहमीच होत आले आहे. आता तसा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले आहे. या पार्ट्यांमध्ये एमएसईबीचे हे कर्मचारी दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे एमएसईबीच्या कार्यालयातील अधिकारी रोशना राऊत आपल्या सहकाऱ्यांसह वसुलीसाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांनी एका धाब्यावर ओली पार्टी केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या महिला अधिकारी दारू पिऊन अर्वाच्य भाषा बोलताना दिसत आहेत. यावर कळस म्हणजे चार ते पाच कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमोह मालखेडीतील अभियंत्यांना घासही भरवताना दिसत आहेl. हा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यात गावातील एका ग्राहकाने व्हायरल केल्याचे सांगण्यात येते. या व्हिडिओमुळे रोशना राऊत या अधिकारी चांगल्याच चर्चेत आणि अडचणीत आल्या आहेत.