Breaking

India : भारताला ‘भारतच’ म्हणा; तीच आपल्या ओळखीची खरी ताकद

RSS chief Mohan Bhagwat expressed a clear opinion : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं स्पष्ट मत

Kochi : भारताला ‘भारत’च म्हणा. ती आपल्या देशाची ओळख आहे, आणि ही ओळख टिकवणं गरजेचं आहे, असं ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं आहे. कोची येथे पार पडलेल्या ‘ज्ञानसभा’ या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात शिक्षण क्षेत्रातील नवे विचार, भारतीय मूल्यांची भूमिका आणि शैक्षणिक धोरणांवरील चर्चांना विशेष महत्त्व देण्यात आलं.

भागवत म्हणाले, भारत हे एक विशेष नाव आहे. त्याचं भाषांतर ‘ इंडिया’ असे करून चालणार नाही. ‘इंडिया म्हणजे भारत’ असं आपण म्हणतो, पण भारत म्हणजे केवळ एक राजकीय किंवा भौगोलिक संज्ञा नाही. ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मूल्यांची ओळख आहे. म्हणून लेखनात, बोलण्यात किंवा सार्वजनिक चर्चेत आपण भारतालाच ‘भारत’ म्हणून संबोधलं पाहिजे.

MSCB employees : महिला अधिकाऱ्याची धाब्यावर ‘ऑन ड्युटी’ ओली पार्टी !

भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना एक उदाहरण दिलं: समजा एखाद्याचं नाव गोपाल आहे, तर इंग्रजीत आपण त्याला ‘ मी. काव्हर्ड’ म्हणत नाही. त्याचप्रमाणे ‘भारत’ हे नाव देखील जसं आहे तसं वापरलं पाहिजे. कारण नावामध्येच ओळख दडलेली असते. भारत हे नाव टिकवणं म्हणजे आपल्या ओळखीचा सन्मान करणं.

विकासाच्या अर्थावर भाष्य करताना भागवत म्हणाले, विकास म्हणजे केवळ यांत्रिक नक्कल नव्हे. सर्कशीत वाघ सायकल चालवतो म्हणून तो महान होत नाही. त्याला कोणी आदराने पाहत नाही. पण जंगलातला वाघ आदराचा आणि भीतीचा विषय असतो. भारतीय शिक्षणही असंच असावं मूळ भारतीयत्व जपणारं आणि आत्मविश्वास वाढवणारं आसवे.

Signatures made while taking sips of alcohol : चक्क बारमध्ये दारूचे घोट घेत ‘शासकीय कारभार’, उपराजधानीत खळबळ !

भारतातलं शिक्षण भारतीय मूल्यांवर आधारित असलं पाहिजे. आपली मूळ ओळख विसरून आपण दुसऱ्यांचं अनुकरण करत राहिलो तर जग आपला आदर करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.स्वतःच्या मूल्यांवर टिकून राहणं आणि त्यात प्रगती साधणं, हेच विकासाचं खरे मोजमाप असल्याचं सांगताना भागवत म्हणाले, जे आहात त्यात उत्कृष्ट बना. दुसऱ्याचं अंधानुकरण करून आपण आपली ओळख गमावतो. प्रगती ही केवळ बाह्य देखाव्यातून नव्हे, तर आत्मिक शुद्धी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणातून साधता येते असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.