Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा

Thackeray group MLAs demand from Governor : ठाकरे गटाच्या आमदारांची राज्यपालांकडे मागणी

Mumbai : राज्यात सत्ताधारी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या वर्तनावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गहिरा झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचे वर्तन विधिमंडळाच्या पावित्र्याला काळिमा फासणारे असून अशा मंत्र्यांना मंत्रीपदावर ठेवणे हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला घातक असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी थेट नावं घेत काही मंत्र्यांची यादीच जाहीर केली. अंधारे म्हणाल्या की, हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या प्रफुल्ल लोढा याच्याकडून अनेक गंभीर माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचाही विचार व्हावा. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री पदावर असलेल्या मंत्र्यांच्या आईच्या नावाने सुरु असलेल्या डान्सबारवर आतापर्यंत तीन वेळा रेड पडल्या असून, अशा व्यक्तीला मंत्रीपदावर ठेवणे हे शासनव्यवस्थेचा अपमान आहे. या प्रकरणात स्पष्टपणे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं नाव घेत त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे.

India : भारताला ‘भारतच’ म्हणा; तीच आपल्या ओळखीची खरी ताकद

सुषमा अंधारे यांनी यावेळी आणखी काही मंत्र्यांविरोधातही आरोप केले. माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात रमी खेळल्याचा आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला गेला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात व्हिट्स हॉटेलमधील कथित पैशांच्या व्यवहाराचे व्हिडीओ, तसेच त्यांच्या सातत्याने चालणाऱ्या वक्तव्यांमुळे देखील त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही, असं अंधारे यांनी सांगितलं. यासोबतच नितेश राणे, संदीपान भुमरे, आणि गिरीश महाजन यांच्याविरोधातदेखील त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली असल्याचं स्पष्ट केलं.

अंधारे म्हणाल्या की, बबड्या आणि बबड्याचा बाबा हे दोघं आणि त्यांचं वागणं पाहता त्यांच्यावरही तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. बबड्या म्हणजेच योगेश कदम यांचं वर्तन आणि त्यांचे संबंध असलेले वादग्रस्त डान्सबार प्रकरण गंभीर असून, त्यांचे वडील रामदास कदम यांनीही यावर मूक पाठिंबा दिल्याचं दिसतं. अंधारे म्हणाल्या की, मी समजू शकते, आपला बबड्या असतो, म्हणून बबड्याच्या बाबाला वाटतं की आपला बबड्या वाचला पाहिजे. पण बबड्या आणि बबड्याचा बाबा जे काही करत आहेत, त्यामुळं त्यांच्या गच्छंतीशिवाय पर्याय नाही.

MSCB employees : महिला अधिकाऱ्याची धाब्यावर ‘ऑन ड्युटी’ ओली पार्टी !

ही सर्व माहिती राज्यपालांनी गांभीर्याने घेतली असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी या मुद्द्यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित पुरावे, मंत्र्यांच्या गैरवर्तनाचे दाखले आणि इतर गंभीर बाबींचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय वर्तुळात या घडामोडीची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ठाकरे गटाच्या थेट राज्यपालांपर्यंत पोचवले आहे.