BJP’s new district body for Akola : अकोला ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये झाले बदल, प्रसिद्धी प्रमुख कायम
Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवीन जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली आहे. या कार्यकारीणीचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा होणार, हे वेळच ठरवेल. भाजप अकोला ग्रामीण जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केली आहे. नव्या कार्यकारिणीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नव्या कार्यकारिणीत संघटन सरचिटणीस म्हणून माधव मानकर यांची नियुक्ती झाली असून, सरचिटणीस म्हणून अंबादास उमाळे, ॲड. रूपाली काकडे आणि राजेश नागमते यांचाही समावेश आहे. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी वसंत बाछुका यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून शंकर वाकोडे, गजानन उंबरकर, राजेश बेले, गणेश तायडे, अमोल साबळे, वैशालीताई निकम, सुलभा सोळंके आणि संदीप उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis : निवडणुका महायुतीतच पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या !
सचिवपदावर विलास पोटे, डॉ. संजय वासुदेव, नंदकिशोर खोकले, मोनाली कमळाकर गावंडे, चंदाताई लवाडे, राखीताई गाडेकर, पुष्पाताई रत्नपारखी आणि दादाराव पेठे यांची निवड झाली आहे.
प्रसिद्धीप्रमुख म्हणून गिरीश जोशी यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. तर कायम निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. आकाश कुंडकर, ॲड. संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, डॉ. उपेंद्र कोठेकर, विजय कमल, तेजराव थोरात, किशोर पाटील, श्रावण इंगळे आणि शिवाजीराव देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीत विविध मंडळांतील आणि क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक सदस्य आहेत.
Local Body Elections : नगरपरिषद निवडणुकांसाठी ७९ मतदान केंद्रांची वाढ!
भाजपच्या इतिहासात एकाच पदावर सर्वाधिक काळ कार्यरत राहण्याचा मान प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांना मिळाला आहे. १९८९ पासून ते सातत्याने या पदावर कार्यरत असून, पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत प्रसिद्धीप्रमुखपदाची जबाबदारी कायम ठेवली आहे.