Congress alleges that the government will be branded as incompetent : शंकराच्या पिंडीपुढे बसवा, अभिषेक करा, शुद्ध करून घ्या
Nagpur : माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहेत. इजा बिजा तिज्या त्यांना काय म्हणायचे आहे, मला माहिती नाही. पण येवढे मात्र खरे की सरकारने निर्णय घेतला नाही, तर सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे, बेईमानीची आहे, असे म्हटले जाईल. सरकार नालायक आहे, असा शिक्का लागेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
नागपुरात आज (२९ जुलै) वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माणिकराव कोकाटेसारख्या डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायचे नसेल, तर श्रावण महिना सुरू आहे. त्यांच्यावर गोमुत्र शिंपडा. शुद्ध गायीचं गोमुत्र शिंपडायला हरकत नाही. त्यांचा अभिषेक करा, पिंडीपुढे बसवा, त्यांना शुद्ध करून घ्या. म्हणजे लोकांना सांगता येईल की, यांना शुद्ध करून घेतले आहे. हनी ट्रॅप शेतकऱ्यांवर वक्तव्य केल्यामुळे ते अशुद्ध झाले होते.
Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !
ऑपरेशन महादेवबद्दल विचारले असता, जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही. पहलगामचे आतंकवादी हल्लेखोर मारले, यावर आम्हाला विश्वास बसणार नाही. या लबाड सरकारवर आमचा विश्वास नाही. पहिली गोष्ट म्हणजे इतके दिवस शोधण्यासाठी कशाला लागले. देशात लपून बसलेल्यांना शोधण्यामध्ये वेळ का जात आहे. भारतीय सैन्य अधिकृतपणे याची पुष्टी करत नाही, तोपर्यंत आम्ही कुणावरही विश्वास ठेवणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
Shweta Mahale : सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासप्रकल्पांनी मी थक्क झाले
महामंडळांच्या नियुक्त्यांबद्दल विचारले असता, हा एक नवीन लॉलीपॉप आहे. त्यांच्याकडे तीन पक्षांची भली मोठी फौज आहे. कोणाकोणाला काय काय मिळणार, हे एक कोडेच आहे. बाकी काही नाही आगामी निवडणुकांसाठी हा एक नवीन फंडा आहे. मंत्री दाबून माल खात आहेत. कार्यकर्ते मात्र निराश आहेत. कार्यकर्त्यांना दररोज एक नवीन चॉकलेट देण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.