Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गरजुंना ईव्ही प्रदान !

Distribution of electric vehicles to the needy in Nagpur people : Catalyst संस्थेच्या माध्यमातून राबवला जातोय उपक्रम

Nagpur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कुठल्याही परियचाची गरज नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आमदारकीची ही त्यांची सातवी टर्म आहे. तीन वेळा त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. या कार्यकाळात त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास साधला. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यभर विविध विकास कामांची गंगा आणली. सुधीर मुनगंटीवार यांचा आज (३० जुलै) वाढदिवस. या निमित्त केवळ जाहिरात, फलकबाजी न करता विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांच्या चाहत्यांकडून राबवले जात आहेत.

आज विविध ठिकाणी अन्नदान, वह्या – पुस्तकांचे वाटप, होम हवन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला (२९ जुलै) नागपूर येथे गरजू लोकांना इलेक्ट्रीक वाहन देण्यात आले. यामध्ये तुंडलवार यांना शिलाई मशीनसाठी अडीच लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वाहन Catalyst या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले. तुंडलवार यांच्या व्यवसायावर अतिक्रमण हटाओ मोहिमेमुळे संकट आले होते.  मुनगंटीवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांना इलेक्ट्रीक वाहन उपलब्ध करून दिले.

Maharashtra politics : आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही !

यापूर्वीही Catalyst या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदत करण्यात आली आहे. भाजी विक्रीसाठी इलेक्ट्रीक वाहन, दुकान सुरू करून देणे, ‘EXAM’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्लासेस लाऊन देण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात आले. कोरोना काळात लोकांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. MAVS टीम, Catalyst टीम या सर्व समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असते. Catalyst हा केवळ एक उपक्रम नसून समाजसेवेसाठी लावलेला एक दिवा आहे, जो कायम तेवत राहील. एक चांगली सुरूवात ही नेहमीच सकारात्मक परिवर्तनाची नांदी असते, असे सांगत Catalyst या संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही ही समाजसेवा अव्याहतपणे सुरू राहणार असल्याचे Catalyst चे संस्थापक राजू मुक्कावार यांनी सांगितले.

Manikrao Kokate : चांगल्या कामगिरीमुळे माणिकराव कोकाटे यांना अभय?

तुंडलवार यांना इलेक्ट्रीक वाहन देताना गणेश चक्करवार, लक्ष्मण उपगन्लावार, सुरेश तन्नीरवार, मनीषा यमसनवार, प्रफुल्ल चेपुरवार, मामा कोटावार आणि आर्यवैश्य समाजातील अनेक बंधू भगीणींची उपस्थिती होती.