Breaking

Student participation : नागपूरच्या विधान भवनात भरली ‘संसद युथ पार्लमेंट’

‘Youth Parliament’ held at Vidhan Bhavan, Nagpur : देशभरातून सहभागी झाले १५० विद्यार्थी

Nagpur : विधानभवनामध्ये संसदीय कामकाज कसे चालते, याचे कुतूहल सर्वसामान्यांना असते. नागपुरात हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नागरिक आपाआपल्या कामांसाठी येतात. तर काही जण फक्त अधिवेशनाचा माहौल बघण्यासाठी येतात. या काळात विद्यार्थ्यांनाही संसदीय कामकाजाचा अनुभव घेण्यासाठी विधान भवनात येण्याची परवानगी दिली जाते. गॅलरीमध्ये बसून ते कामकाजाचा अनुभव घेतात.

या सर्व प्रक्रियेची पुढची पायरी म्हणजे ‘संसद युथ पार्लमेंट’ नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लमेंटचे आयोजन केले. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना विधान भवनात हे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली होती. देशभरातून तब्बल १५० विद्यार्थी ‘संसद युथ पार्लमेंट’मध्ये सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. विधान भवनासोबत विद्यार्थ्यांना आमदार निवाससुद्धा राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ; मोठ्या नेत्याचा राजीनामा

नागपूरच्या विधान भवनात हिवाळी अधिवेशनाव्यतिरिक्त राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि संसदीय अभ्यास वर्गांच्या माध्यमातून कायदेमंडळाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जावे, यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांअंतर्गत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परवानगी दिल्यनंतर ‘संसद युथ पार्लमेंट’चं आयोजन करण्यात आलं. मंत्री आणि आमदारांच्या जागांवर बसून या विद्यार्थ्यांनी दोन दिवस युवा संसदेचा अनुभव घेतला.