Breaking

Maharashtra politics : सप्टेंबरनंतर राज्यात मोठा स्फोट? सत्तेतील उलथापालथीचे संकेत

Sanjay Rauts warning creates a stir in political circles : संजय राऊतांच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai : राज्यातील राजकारणात सध्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. मंत्र्यांच्या खातेबदलांपासून ते दिल्लीतल्या बैठकींपर्यंत अनेक घडामोडी घडत असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. “सप्टेंबरपर्यंत वाट पाहा,” असे राऊत म्हणाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, “मित्रपक्षांसोबत काम करणं अवघड झालं आहे,” असे सांगितल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या मते, फडणवीस यांना राज्यातील सद्यस्थितीमुळे ओझं झालं असून त्यातून ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.

Minister of Agriculture : मला कृषीखात्याची ‘ऑफर’ होती, पण मी नकार दिला

याचवेळी त्यांनी हेही सांगितले की, काही मंत्र्यांवर गंभीर आरोप असून त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे. वसईच्या आयुक्तांवर पडलेल्या धाडीत 1000 कोटी रुपयांचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात एका मंत्र्याची अडचण वाढू शकते. काही मंत्र्यांची खाती बदलण्याची कारवाई केवळ थातूरमातूर असून, प्रत्यक्षात मोठा बदल अपेक्षित असल्याचे राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याच्या उचलबांगडीनंतर सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. ईतर मंत्रीही अडचणीत येणार असा इशारा राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही आठवड्यांत आणखी खातेबदल किंवा राजकीय हालचाली घडू शकतात.

Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही

सप्टेंबरनंतर काय होणार याबाबत राऊत अधिक काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून विरोधकांनीही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या राज्यात सत्तेचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

____