Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतीत निधी गैरव्यवहाराचा आरोप; ३.५ कोटींच्या खर्चाचा हिशेब गायब

Protest by locking gram sevaks and members in the office : ग्रामसेवक व सदस्यांना कार्यालयात कोंडून आंदोलन; पंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Buldhana १५व्या वित्त आयोगातून आलेल्या कोट्यवधीच्या निधीच्या खर्चाचा हिशेब न दिल्याने धाड ग्रामपंचायतीत वादाची ठिणगी पडली आहे. ग्रामसेवक विष्णू इंगळे यांच्याकडे वारंवार माहिती मागूनही प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी दुपारी ग्रामसेवकासह स्वत:लाही कार्यालयात कोंडले.
३.५ कोटी रुपयांच्या निधीतील अनियमिततेचा आरोप करत सदस्यांनी सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरु केले असून, सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.

माजी सरपंच व विद्यमान सदस्य रिजवान सौदागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात, डस्टबिन खरेदी, धूर फवारणी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य शिबिर आदी कामांमध्ये प्रमाणाबाहेर खर्च दाखवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Khotkar Vs Gorantyal : भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले?

सदस्यांचा आरोप आहे की, “वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही ग्रामसेवक निधीचा तपशील देत नाहीत. हा प्रकार दडपशाही व भ्रष्ट कारभाराचा भाग आहे.”

३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून आंदोलन सुरू झाले असून, “जोपर्यंत खर्चाचा संपूर्ण हिशेब दिला जात नाही, तोपर्यंत ग्रामसेवक वा कोणीही कार्यालयातून बाहेर जाणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघाल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण होते.

Prajwal Revanna : १२० साक्षीदारांचे जबाब, व्हिडीओ पुराव्यांचा आधार

यासंदर्भात ग्रामसेवक विष्णू इंगळे म्हणाले, “धाड ग्रामपंचायतीत माझी नुकतीच बदली झाली आहे. या कारभाराची संपूर्ण माहिती मला अद्याप मिळालेली नाही.” मात्र आंदोलनकर्त्यांनी या स्पष्टीकरणावर विश्वास दाखवलेला नाही.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतील निधी गैरव्यवहाराचे हे प्रकरण स्थानिक राजकारणात मोठे वादळ निर्माण करू शकते. काँग्रेस, भाजप, आणि शिंदे गटाच्या स्थानिक गटांमध्ये या प्रकारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.