Eknath Shinde Sena : शिंदे गटातील शिवसैनिकांचा उद्धवसेनेत प्रवेश

Party workers from Shinde group join Uddhav Thackarey group : “येणारा काळ उद्धव सेनेचा सुवर्णकाळ असेल” – आमदार सिद्धार्थ खरात यांचा दावा

Mehkar : मेहकर विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक शिवसेना बालेकिल्ला असलेल्या डोणगाव सर्कलमध्ये राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. शिंदे गटातील सक्रिय शिवसैनिक जावेद खान व त्यांच्या समर्थकांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. आशिष रहाटे (उपजिल्हा प्रमुख), निंबाजी पांडव (तालुका प्रमुख), किशोर गारोळे (शहर प्रमुख), ॲड. संदीप गवई, अर्जुनराव बाजड, दीपक गायकवाड, मदन बाजड, सूरज बाजड, प्रकाश मानवतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, “परिवर्तनाचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले आहेत. जनतेचा विश्वास हेच आमचे बळ असून विरोधक कितीही प्रयत्न केले, तरी परिवर्तन अटळ आहे. येणारा काळ उद्धव सेनेचा सुवर्णकाळ ठरेल.”

Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतीत निधी गैरव्यवहाराचा आरोप; ३.५ कोटींच्या खर्चाचा हिशेब गायब

जावेद खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मुस्लीम समाजातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण मतदारसंघात संघटनात्मक हालचालींना वेग देण्यात आला आहे. संपर्क दौरे, शाखा बैठका आणि पक्षवाढीचे नियोजन सुरु असून, यामुळे उद्धव सेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे संकेत स्थानिक राजकारणात स्पष्ट होत आहेत.