Breaking

Sanatani terrorism : सनातनी दहशतवाद? हे तर ‘ थिंक टँक नव्हे, सेप्टिक टँक!’

 

Prakash Mahajans strong attack on Prithviraj Chavan : प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार हल्लाबोल

Mumbai : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चव्हाण यांनी “भगवा दहशतवाद” हा शब्द वापरण्याऐवजी “सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद” म्हणा, असे विधान केल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी हा शब्द वापरून स्वतःला काँग्रेसच्या थिंक टँकऐवजी सेप्टिक टँक असल्याचे सिद्ध केले आहे.” त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना विचारले की, “भगवा आतंकवाद म्हणालात, मग हिरवा आतंकवाद म्हणण्याची हिंमत काँग्रेसमध्ये आहे का?

Teachers constituency : अमरावती विभागासाठी शिवसेनेची रणनिती; भगवा फडकवण्याचा निर्धार

 

महाजनांनी म्हटले की, “भगवा रंग हा शिवाजी महाराजांचा, संत तुकारामांचा, संत ज्ञानेश्वरांचा आणि वारकरी संप्रदायाचा आहे. त्यामुळे तो आतंकवादासोबत जोडणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे.” तसेच, “महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू मानत होते. मग पृथ्वीराज चव्हाण यांना त्यावर काय म्हणायचं आहे?” असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला.
त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, “हिंदू समाजाला बदनाम करून मतांचे राजकारण करण्याचा काँग्रेसचा जुना डाव आहे.” राहुल गांधींच्या विचारांनुसारच पृथ्वीराज चव्हाण बोलत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “भगवा रंग हा महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी पवित्र आहे. हा रंग शिवरायांचा, स्वातंत्र्यलढ्याचा आणि संत परंपरेचा आहे. कृपा करून आतंकवादाला धर्म, जात किंवा रंग देऊ नका.” त्यांनी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनाही विनंती केली की, “रंग नको, तर तुम्ही सनातनी आतंकवाद म्हणा.”

Sanatani Terrorism : ‘ सनातनी दहशतवाद’ वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला !

या वादाला शिंदे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले असून, मुंबईतील टिळक भवनावर त्यांनी मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा भवनापासून काही अंतरावरच थांबवला. टिळक भवनात प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली असली, तरी पोलिसांनी ती फेटाळली.या संपूर्ण घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भगवा आणि सनातन यावरील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

_____