Discipline broken at Brahmanwada Thadi Gram Panchayat officea : ग्रामपंचायत कार्यालयातील घटना सीसीटीव्हीत कैद; अमरावती जिल्ह्यातील प्रकार
Amravati जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासनाची शिस्त धाब्यावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात थेट कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून तीव्र बाचाबाची झाली. वाद एवढा टोकाला गेला की, महिला सरपंचाने सदस्याच्या कानशिलात मारले आणि सदस्यानेही त्यास प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की झाली.
घटनेच्या वेळी कार्यालयात नियमित कामकाज सुरू होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Sanjay Shirsat : शिरसाट म्हणतात, ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जायंत?’
प्राथमिक माहितीनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील एका जमिनीच्या “नमुना आठ अ फेरफार” बाबत दोघांमध्ये मतभेद झाले. याच वादातून वाचा-वाचीतून थेट मारहाणीपर्यंत प्रकार गेला. कार्यालयात उपस्थित असलेल्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केलं.
या हाणामारीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी घेतले गेले आहे. ग्रामपंचायतसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अशाप्रकारचा असभ्य वर्तनाचा प्रकार समोर आल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
Pankaja Munde : माझं काम पोलिसांसारखं, शिटी वाजवून नियम दाखवायचे, पण काम करायला निधीच नाही
नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनी जर असे वागायला सुरुवात केली, तर सामान्यांचे प्रश्न कोण सोडवणार?” असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीची प्रतिमा मलीन झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.