Breaking

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

Jayashree Patil’s direct question to Raj Thackeray : राज ठाकरेंवर जयश्री पाटलांचा थेट सवाल

 

Mumbai : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील डान्सबारांची संख्या वाढल्याचा निषेध व्यक्त केल्यानंतर या मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादात गुणवंत सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

पाटील म्हणाल्या की, त्या डान्सबार ऑर्केस्ट्रा संघटनेच्या वकील आहेत आणि कायद्यानुसार डान्सबारवर कधीच संपूर्ण बंदी नव्हती. मॅक्सिमम डान्सबार हे मराठी लोकांचेच आहेत; राज ठाकरे यांनी हा अभ्यासच केलेला नाही. त्यांनी केलेले आरोप स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आहेत.
त्यानंतर पाटील यांनी राज ठाकरे यांची वैयक्तिक पातळीवरही कानउघाडणी केली. राज ठाकरे, तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता ते सांगा. शिवाजी पार्कलगत राहायला तुम्ही गेलात त्यामागे काय गणित आहे? कोहिनूर स्क्वेअरबाबत आम्ही अभ्यास सुरू केला, तर तुमचं काय होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray : मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही !

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पनवेलच्या कोनगाव येथील ‘नाईट राईड’ डान्सबारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसेच्या ‘खळखट्याक’ पद्धतीच्या कारवाईनंतर पोलिसांनी बारच्या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्हा छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा असल्याचा उल्लेख करत, अशा पवित्र जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असणे दुर्दैवी, असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाल्या, हा देखील एक व्यवसायच आहे; जिथे मागणी तिथे पुरवठा असतो. राज ठाकरे फक्त लोकांचे व्यवसाय मोजत बसले आहेत.

Raj Thackeray : …तर काढला जाऊ शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा !

 

या नवीन आरोप–प्रत्यारोपामुळे पनवेलपासून मुंबईपर्यंत डान्सबार प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मनसेच्या तोडफोडीनंतर कायदेशीर आणि राजकीय लढाई अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.