Breaking

Devendra Fadnavis : मत्स्यव्यवसायामुळे वाढतील रोजगार, मुख्यमंत्र्यांना विश्वास

Fisheries will become employment booster : राज्यातील ४० टक्के मत्स्य उत्पादन गोड्या पाण्यातून

Amravati राज्यातील जवळपास ४० टक्के मत्स्यउत्पादन गोड्या पाण्यातून होत आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहे. शेततळ्यांद्वारे शेतकऱ्यांनी सिंचनासह मत्स्यव्यवसाय सुरू केल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. हा व्यवसायामुळे आता रोजगाराचे नवे दालन देखील खुले होत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोर्शी येथे पश्चिम विदर्भातील पहिल्या आणि राज्यातील चौथ्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांची उपस्थिती होती.

Skilled manpower : उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षित, कुशल मनुष्यबळ तयार करणार !

राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे तो आता प्राधान्याच्या क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. यामुळे मत्स्यशेती करणाऱ्यांना कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, आणि अन्य सवलती सहज उपलब्ध होत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वैनगंगा-नळगंगा या सुमारे ५५० किमी लांबीच्या पाणीयोजनेद्वारे गोसेखुर्दचे पाणी बुलढाणापर्यंत पोहोचणार आहे. ३१ धरणांच्या माध्यमातून या प्रकल्पावर अंदाजे एक लाख कोटींचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना’ राबवली जात आहे. मोर्शीमध्ये हा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामार्फत शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळणार आहे. दरम्यान, वीज दरात २६ टक्क्यांची घट झाली असून, १०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाच्या सहकार्याने ३० लाख घरे मंजूर करण्यात आली असून, सर्वेक्षणातून वगळलेल्या नागरिकांनाही हक्काचे घर मिळवून देण्यात येणार आहे. याशिवाय ५ लाख घरांवर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. अतिरिक्त वीज शासन खरेदी करेल, यामुळे विजेच्या खर्चातून नागरिकांची सुटका होणार आहे.

Pankaja Munde : माझं काम पोलिसांसारखं, शिटी वाजवून नियम दाखवायचे, पण काम करायला निधीच नाही

नितेश राणे म्हणाले, “महाविद्यालयाची इमारत दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे मच्छीमारांना आधुनिक प्रशिक्षण आणि सुविधा मिळणार आहेत. मार्वल कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) करार करण्यात आला असून, यामुळे मत्स्य व्यवसायात आमूलाग्र बदल घडेल.”