Minister Bhujbal awaits entry in home due to Dhananjay Munde : धनंजय मुंडेंमुळे, मंत्री भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत
Mumbai : राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा दिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आता दुसऱ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. मंत्रीपद सोडून चार महिने उलटले, तरी मुंडेंनी शासकीय ‘सातपुडा’ बंगला अद्याप सोडलेला नाही. परिणामी त्यांच्यावर तब्बल 42 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेतच आहेत.
धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. शासकीय नियमानुसार मंत्रिपद सुटल्यानंतर 15 दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामं करणं आवश्यक असतं. मात्र, मुंडेंनी सातपुडा बंगला अजूनही ताब्यात ठेवल्याचे समोर आलं आहे. याच बंगल्यासाठी 23 मे रोजी छगन भुजबळ यांच्या नावावर शासकीय आदेश निघाला होता. तरीही भुजबळांना आजतागायत बंगला हस्तांतरीत झालेला नाही.
Political events : राजकीय वातावरण तापले ‘सप्टेंबरमध्ये मोठा स्फोट’ !
मुंडेंना बंगला रिकामा न करता राहण्याचा खर्च आता चढत जाऊन थेट 42 लाख रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दोन प्रभावशाली नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यातील बंगला संग्रामाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सातपुडा बंगल्यासोबतच इतर मंत्र्यांना मिळालेले बंगल्यांचे तपशीलही समोर आले आहेत.
विधान परिषद सभापती राम शिंदे यांना निवासस्थान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘ज्ञानेश्वरी’, चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘शिवगिरी’, राधाकृष्ण विखे-पाटील यांना ‘रामटेक’, हसन मुश्रीफ यांना ‘रॉयलस्टोन’, चंद्रकांतदादा पाटील यांना ‘विशाळगड’, गिरीश महाजन यांना ‘सिहगड’, गुलाबराव पाटील यांना ‘सेवासदन’, गणेश नाईक यांना ‘जेतवन’, दादा भुसे यांना ‘पावनगड’, संजय राठोड यांना ‘जंजीरा’, मंगलप्रभात लोढा यांना ‘शिवनेरी’, उदय सामंत यांना ‘विजयदुर्ग’जयकुमार रावल यांना ‘मुक्तागिरी’, पंकजा मुंडे यांना ‘चित्रकूट’, अतुल सावे यांना ‘पर्णकुटी’, अशोक उईके यांना ‘शिवगड’.
Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !
शंभूराजे देसाई यांना ‘लोहगड’, आशिष शेलार यांना ‘मेघदूत’, दत्तात्रय भरणे यांना ‘रत्नसिषु’, अदिती तटकरे यांना ‘सिध्दगड’, शिवेंद्रराजे भोसले यांना ‘प्रतापगड’, माणिकराव कोकाटे यांना ‘पन्हाळगड’, जयकुमार गोरे यांना ‘अंबर-२७’, नरहरि झिरवाळ यांना ‘प्रचितीगड’, संजय सावकारे यांना ‘सुरुचि ०९’, संजय शिरसाठ यांना ‘अंबर-32’, प्रताप सरनाईक यांना ‘अंबर-38’, भरत गोगावले यांना ‘अर्वतो-५’ आणि मकरंद पाटील यांना ‘सुरुचि- 03’ बंगले मिळाले आहेत.सातपुडा बंगला राज्यात राजकीय शक्तिसमीकरणाचं प्रतिक ठरत असताना, त्याभोवतीचा वाद सरकारमधील अंतर्गत तणावालाही अधोरेखित करत असल्याची कुजबुज सुरू आहे.